‘कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं राहत नाही,’ सोमय्या यांना नोटीस येताच प्रविण दरेकर आक्रमक

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमय्या यांना आलेल्या नोटिशीचा निषेध केला आहे. तसेच कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं राहत नाही असं म्हणत राज्य सरकारचे कान टोचले आहेत.

'कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं राहत नाही,' सोमय्या यांना नोटीस येताच प्रविण दरेकर आक्रमक
pravin-darekar

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली आहे. त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच सोमय्या यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या संपूर्ण घडामोडीनंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमय्या यांना आलेल्या नोटिशीचा निषेध केला आहे. तसेच कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं राहत नाही असं म्हणत राज्य सरकारचे कान टोचले आहेत. (pravin darekar criticizes state government on kolhapur district collector notice to kirit somaiya)

मुस्कटदाबी सरकारने करायला नको होती

“किरीट सोमय्या यांच्यावर स्थानबद्ध करण्याची कारवाई केली जात आहे. या कारवाईचा मी निषेध करतो. सोमय्या हसन मुश्रीफ यांचा दुसरा कथित घोटाळा बाहेर काढण्यासाठी कोल्हापूरला जात आहेत. मात्र त्या ठिकणी कलम 144 लावून सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. खरं तर ते देवदर्शन घेऊन कोल्हापूरला जाणार होते. परंतु अशा प्रकारची मुस्कटदाबी सरकारने करायला नको होती,” असं दरेकर म्हणाले.

कोंबड झाकलं म्हणून उजाडायचं राहत नाही

तसेच पुढे बोलताना सरकारचे तीस ते चाळीस पोलीस सोमय्या यांच्या मुलुंड येथील घरासमोर आहेत. त्यांना स्थानबद्ध केलं जात आहे. लोकशाहीला शोभा देणारी ही कारवाई नाही. कोंबड झाकलं म्हणून उजाडायचं राहत नाही. अशा प्रकराच्या कारवाईने सत्य लपवता येणार नाही. सोमय्या यांना जे करायचं आहे ते करतच राहतील, असं दरेकर यांनी सरकारला ठणकाऊन सांगितलं. तसेच अशा प्रकारचं दबावाचं राजकारण लोकशाहीला मारक असल्याचंही दरेकर म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे ?

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. मात्र सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली आहे. या नोटिशीमध्ये सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच तसेच कोल्हापुरात कलम 144 लावण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या याच नोटिशीनंतर भाजप आक्रमक झाली आहे. माझ्या दौऱ्यामध्ये ठाकरे सरकारकडून खोडा घातला जातोय, असा आरोप खुद्द सोमय्या यांनी केला आहे. मला गणेश विसर्जनासाठी जाऊ दिले जात नाहीये. माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवण्यात आले आहेत, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या :

प्रेयसीने त्याच्यासाठी घर विकलं, पैसे दिले, पण प्रियकराने तिच्या तीनही लेकरांसह तिला संपवलं, युपीतल्या चार हत्यांचं ठाणे कनेक्शन

किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध, कोल्हापुरात नो एन्ट्री; घराभोवती पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, गांधी घराण्याशी घनिष्ठ संबंध; कोण आहेत सुखजिंदरसिंग रंधावा?

(pravin darekar criticizes state government on kolhapur district collector notice to kirit somaiya)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI