प्रवीण दरेकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पुण्यात जोडे मारो आंदोलन, तर उस्मानाबादेत वंगण फासण्याचा इशारा

रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांनी माफी मागावी अशी मागणी केलीय. दरेकर माफी मागा, नाहीतर महिलांचा अपमान करणाऱ्यांचं आम्ही थोबाड आणि गाल रंगवू, असा इशारा चाकणकरांनी दिलाय. त्यानंतर आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून पुण्यात आणि उस्मानाबादेत आंदोलन करण्यात आलं.

प्रवीण दरेकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पुण्यात जोडे मारो आंदोलन, तर उस्मानाबादेत वंगण फासण्याचा इशारा
प्रविण दरेकर


मुंबई : भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांनी माफी मागावी अशी मागणी केलीय. दरेकर माफी मागा, नाहीतर महिलांचा अपमान करणाऱ्यांचं आम्ही थोबाड आणि गाल रंगवू, असा इशारा चाकणकरांनी दिलाय. त्यानंतर आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून पुण्यात आणि उस्मानाबादेत आंदोलन करण्यात आलं. (NCP Women and Youth Congress aggressive against Praveen Darekar)

पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं प्रवीण दरेकरांविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आलं. प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दरेकर यांच्यावर जोरदार टीका केली.

दरेकरांना वंगण फासण्याचा इशारा

दुसरीकडे उस्मानाबादेत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनीही प्रवीण दरेकरांना इशारा दिलाय. दरेकर यांनी 24 तासात माफी मागितली नाही तर त्यांच्या तोंडाला काळे वंगण फासणार असल्याचा इशारा सलगर यांनी दिलाय. दरेकर यांनी 24 तासात माफी मागा नाही तर परिणामाला सामोरे जा, असं आव्हानही सलगर यांनी दिलंय.

प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा सलगर यांनी निषेध केला. भाजप हा महिलांच्या बाबतीत हीन मनोवृत्ती दर्शवणारा पक्ष, दरेकर यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे फडणवीस साहेब तुमच्या वाचाळ वीरांना आवरा, राम कदम, परिचारक व आता दरेकर यांना आवरा असा टोला सलगर यांनी लगावला आहे.

प्रविण दरेकर काय म्हणाले?

प्रविण दरेकर काल शिरुर दौऱ्यावर होते. राजे उमाजी नाईक यांच्या 230व्या जयंती निमित्ताने जय मल्हार क्रांती संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी दरेकर यांनी हे विधान केलं. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केलीय. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतेय.

चाकणकरांचा हल्लाबोल

दरेकर यांच्या या विधानावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. दरेकर यांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा. नाही तर आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

इतर बातम्या :

दरेकरांच्या ‘मुक्या’नं पक्षाची गोची? चंद्रकांत पाटील म्हणतात, त्यांच्या मनात अश्लिल अर्थ नव्हता!

सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादी प्रवेश, दरेकर म्हणतात, राष्ट्रवादी रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष

NCP Women and Youth Congress aggressive against Praveen Darekar

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI