AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादी प्रवेश, दरेकर म्हणतात, राष्ट्रवादी रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष

लावणी कलावंत सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. 16 ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. या प्रवेशाबाबत बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.

सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादी प्रवेश, दरेकर म्हणतात, राष्ट्रवादी रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 12:26 PM
Share

पुणे : सुप्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. 16 ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. या प्रवेशाबाबत बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. दरेकर यांनी आज पुण्यातील शिरुरमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यावरुन आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिरूर येथे राजे उमाजी नाईक यांच्या 230 व्या जयंती निमित्त जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला दरेकर उपस्थित होते. ( Praveen Darekar’s Offensive Criticism on NCP, Amol Mitkari and Rupali Chakankar Reply)

राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केलीय. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतेय.

बेरड, रामोशी समाजाला दरेकरांचं आश्वासन

प्रवीण दरेकर आज शिरुर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेस हा बँकवाल्यांचा, कारखानदारांचा पक्ष आहे. तर भाजप हा गोरगरीबांचा पक्ष आहे. 7 ते 8 वर्ष झाली घोडगंगा कारखान्याचा पगार नाही. महाविकास आघाडी सरकारला सांगतो तुमची सत्ता उद्ध्वस्त करण्याचं काम बेरड आणि रामोशी समाज करेल. या समाजाच्या अनेक मागण्या आहेत. दुर्दैवानं आपलं सरकार आलं नाही. पण त्या प्रश्नांना न्याय देऊ, असं आश्वासन दरेकर यांनी दिलं आहे.

पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत बलात्कार, महिलांवर अत्याचार होत आहेत. याला हे नालायक सरकार जबाबदार आहे. त्यांना फक्त आपली सत्ता टिकवायची आहे. काही त्यांना काही देणंघेणं नाही, असा आरोपही दरेकरांनी केलाय. बैलगाडा शर्यतीत जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे 15 दिवसांत मागे घेऊ असा शब्द दिला गेला. मात्र अद्याप ते गुन्हे मागे घेतले गेले नाहीत. महत्वाची बाब म्हणजे गृहमंत्री पुणे जिल्ह्याचेच आहेत.

ओबीसी आरक्षणावरुनही दरेकरांचा हल्लाबोल

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवरुनही प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. या निर्णयाविरुद्ध सरकारला शंभर टक्के अध्यादेश काढता आला असता. मात्र या सरकारचा निष्काळजीपणा, दिरंगाई आणि ढिसाळपणा कारणीभूत आहे. कोर्टानं चार चार वेळा कळवले मागासवर्गीय आयोग स्थापन करुन कोर्टाला कळवावं. ते सहज शक्य होतं. मात्र, जाणीवपूर्वक सरकारने दुर्लक्ष केलं. आता सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्यानंतर गतीने निर्णय घेतले असते तर कदाचित कोर्टानं भूमिकाही बदलली असती, असं दरेकर म्हणाले.

सरकारमधील काही लोकांना ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचे नाही असं दिसतं. बैठकांवर बैठका होत आहेत पण जाणीवपूर्वक निर्णय होत नव्हता. सर्व राजकीय पक्षांचे नेते तिथे होते. मात्र नुसत्या बैठका घेतल्या गेल्या. सरकारकडून निर्णय काही झाला नाही. निर्णय झाला असता तर आज कदाचित वेगळा निर्णय आला असता, असंही दरेकर म्हणाले.

इतर बातम्या :

अनिल देशमुखांच्या शोधासाठी ईडीने मागितली सीबीआयची मदत, तर भाजप नेत्यांचे राज्य सरकारला सवाल

खोटे आरोप, मंत्र्यांना टार्गेट करणं चुकीचं; जाणीवपूर्वक बदनामी सुरु असल्याचा जयंत पाटलांचा आरोप

Praveen Darekar’s Offensive Criticism on NCP, Amol Mitkari and Rupali Chakankar Reply

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.