प्रियांका गांधींनी प्रचार केलेल्या 97 टक्के जागांवर काँग्रेसचा पराभव

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. एकीकडे एनडीए सत्तास्थापनेचा दावा करत असताना, काँग्रेसमध्ये मात्र मतभेदाचे वातावरण दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियांका गांधी यांची महासचिवपदी नियुक्ती केली होती. अवघ्या काही महिन्यापूर्वी राजकारणात सक्रीय झालेल्या प्रियांका यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचा जोरदार प्रचार केला. मात्र प्रियांका यांनी प्रचार केलेल्या […]

प्रियांका गांधींनी प्रचार केलेल्या 97 टक्के जागांवर काँग्रेसचा पराभव
Follow us
| Updated on: May 25, 2019 | 5:56 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. एकीकडे एनडीए सत्तास्थापनेचा दावा करत असताना, काँग्रेसमध्ये मात्र मतभेदाचे वातावरण दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियांका गांधी यांची महासचिवपदी नियुक्ती केली होती. अवघ्या काही महिन्यापूर्वी राजकारणात सक्रीय झालेल्या प्रियांका यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचा जोरदार प्रचार केला. मात्र प्रियांका यांनी प्रचार केलेल्या 97 टक्के जागांवर काँग्रेसला दारुण पराभव स्विकारावा लागला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्याच्या तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसने प्रियांका गांधी यांना राजकारणात सक्रीय केलं होतं. काँग्रेसच्या महासचिवपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रियांका यांनी लोकसभेची जोरदार तयारी केली. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रियांका यांनी 38 प्रचारदौरे केले. यात मध्यप्रदेश, दिल्ली, झारखंड, हरियाणा या ठिकाणी 12 प्रचार दौऱ्याचं आयोजन केलं होतं. तर एकट्या उत्तरप्रदेशात प्रियांका यांचं 26 प्रचारदौऱ्यांचं आयोजन केलं होतं. मात्र प्रियांका गांधींनी प्रचार केलेल्या उत्तरप्रदेशात काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

उत्तरप्रदेश हे राज्य निवडणुकीतील महत्त्वाचे ठिकाण मानलं जातं. देशात एकूण 543 लोकसभा मतदारसंघ आहेत. यातील सर्वाधिक 80 मतदारसंघ हे एकट्या उत्तरप्रदेशात आहेत. त्यामुळे केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी उत्तरप्रदेश हे महत्त्वाचे ठिकाण मानलं जातं. या लोकसभा क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघ, गांधी किंवा नेहरू परिवाराचा पारंपारिक अमेठी आणि रायबरेली मतदारसंघाचा यात समावेश होतो. याच कारणामुळे अनेक राजकीय नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीपूर्वी, निवडणुकीदरम्यान उत्तरप्रदेशाचा दौरा करतात.

यंदाही अनेकांनी निवडणुकीदरम्यान उत्तरप्रदेशाचा दौरा केला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांसारख्या अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या महासचिवपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रियांका गांधी यांनी उत्तरप्रदेशात 26 प्रचारदौरे केले. प्रियांका यांच्या प्रचारदौऱ्यानंतर काँग्रेसचा विजय होईल असे अनेकांना वाटत होते, मात्र प्रियांका यांच्या प्रचारदौऱ्यानंतर काँग्रेसला अनेक ठिकाणी पराभव स्विकारावा लागला आहे.

लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालाची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची संपूर्ण आकडेवारी निवडणूक आयोगाने  घोषित केली. यानुसार भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळाला.

लोकसभा निवडणुक 2014 मध्ये काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये त्यात वाढ झाली असली, तरी स्वत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाच अमेठीत पराभव झाला. राहुल गांधी दोन जागेवर उभे होते, त्यापैकी केरळमधील वायनाड इथे त्यांचा मोठा विजय झाला. तर सोनिया गांधी यांचा उत्तरप्रदेशातील रायबरेली मतदारसंघात विजय झाला आहे. काँग्रेस संपूर्ण उत्तरप्रदेशात जवळपास 67 जागांवर लढली होती. मात्र यातील केवळ एकाच रायबरेली मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळाला आहे. बाकी 66 मतदारसंघात काँग्रेसला पराभव स्विकारावा लागला आहे.  यामुळे काँग्रेसने निवडणुकीपूर्वी काढलेला हुकमी एक्का फेल ठरल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.