AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

CJP Protest Delhi : जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. यादरम्यान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील दिल्लीत पोहोचले. त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली आणि आंदोलकांसोबत संवाद साधला. त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला.

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही... मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..
Manoj Jarange Patil
| Updated on: Jul 22, 2026 | 12:58 PM
Share

जंतर मंतरवर नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन केले जात आहे. काल शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली. आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला शरद पवार पोहोचले. यावेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. मराठा समाजाचे नेते आंदोलन मनोज जरांगे पाटील दिल्ली दाैऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली. सरकारला मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, शांततेच्या आंदोलनात ताकद आहे, हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत. जागा फक्त सोडू नका, त्यांना आपण निवडून दिलेले आहे. आपण आपल्या मायबापांनी यांना मतदान केले. आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केले.

आपल्या जिल्ह्यांने तालुक्याने यांना मतदान केले. पण आज हेच आपल्या विद्यार्थ्यांवरती लेकरा बाळांवरती उलटले आहेत.  यांना उलटे करण्याची ताकद या विद्यार्थ्यांमध्ये आणि राज्यातील गोरगरीब जनतेत आहे, हे यांच्या लक्षात नाहीये. जर या पुढच्या काळात तुम्हाला जर कुठे धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. सर्व देश, राज्य तुमच्यासोबत आहे, एवढ्याच शब्द देतो.

इथे जे पोरं बसले आहेत, त्यांची तळमळ आहे. पण एखाद्या निर्णयामुळे त्यांची तळमळ मोडू नये. शांततेत राहिले तर न्याय मिळतो. जंतर मंतरची जागा ही आंदोलनाची जागा आहे, त्यामुळे इथे ते काही करू शकत नाहीत, त्यामुळे आंदोलकांनी ही जागा सोडून नये. जर इथे येऊन त्यांनी काही केले तर त्यांना आपल्या गावात फिरता येणार नाही, आपल्या जिल्ह्यात फिरता येणार नाही.

पुन्हा जर लाठीचार्ज केला तर महाराष्ट्रात यांना फिरू देणार नाही, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाचे समर्थन केले. काल दुपारी या आंदोलकांना भेटण्यासाठी जंतर मंतरवर शिवसेना नेते संजय राऊतही पोहोचले होते. विरोधकांनी हे आंदोलन आपल्या हातात घ्यावे, असे आवाहन राऊतांनी केले होते.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?