गेल्या जन्मी पाप करतो तो नगरसेवक, महापाप करतो तो महापौर होतो : देवेंद्र फडणवीस 

पुण्यात मोठ्या प्रमाणात खासगी वाहने आणि दुचाकी वाहने आहेत," असेही देवेंद्र फडणवीस (Pune Devendra fadnavis on mayor) म्हणाले.

गेल्या जन्मी पाप करतो तो नगरसेवक, महापाप करतो तो महापौर होतो : देवेंद्र फडणवीस 
Follow us
| Updated on: Feb 17, 2020 | 7:20 PM

पुणे : “पुण्यात खूप क्षमता आहे. ते आंतरराष्ट्रीय नकाशावर आहे. अजूनही ते विकसित होऊ शकतं. पुणे महानगरपालिकेकडून शहराचा भौतिक विकासबरोबर सर्वांगीण विकास करणं गरजेचं आहे. 21 व्या शतकातील शहरांकडून अपेक्षा वेगळ्या आहेत. नागरीकरण वाढलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी दोन महापालिका आहेत. कदाचित भविष्यकाळात दोन अजून महापालिका होऊ शकतील एवढ्या मोठ्या काळात नागरीकरण या ठिकाणी झालं आहे,” असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Pune Devendra fadnavis on mayor) म्हणाले.

पुण्याच्या महापौरपदाचा मान प्रथमच कोथरुडला मिळाल्याने महापौर मुरलीधर मोहोळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला.  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीसांनी मोहोळ यांना अनेक राजकीय सल्ले दिले.

“पुण्याचे नवे महापौर मुरलीधर मोहोळ हे हाडाचे कार्यकर्ते आहे. ही त्यांच्या आयुष्याची सुरुवात आहे. त्यांना माजी महापौर अंकुश काकडे पण शुभेच्छा आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाची पदं मुरलीधर मोहोळ यांना मिळतील. ते राज्याचे उमदे नेते म्हणून पाहायला मिळतील. मी पण दोनदा महापौर झालो आहे,” असेही फडणवीस (Pune Devendra fadnavis on mayor) यावेळी म्हणाले.

“ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं आहे तो नगरसेवक आणि महापाप करतो तो महापौर होतो. कारण काम करुनही अनेकांच्या शिव्या खावा लागतात,” असेही वक्तव्य फडणवीसांनी यावेळी केलं.

“राजकारणात संयम महत्वाचा आहे. तुम्ही कधी आणि कुठे काय बोलावे हे समजलं पाहिजे. माध्यमांमुळे कधी बोलू नये हे महत्त्वाचे आहे. हे समजलं तर तुम्ही यशस्वी होता,” असा सल्लाही फडणवीसांनी मोहोळ यांना दिला.

“पुण्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होतो आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतोय, वायू आणि पाणी प्रदूषण होत आहे. 90 टक्के प्रदूषण वाहने आणि पाण्यातून होतो आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुविधा निर्माण होण्याची गरज आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात खासगी वाहने आणि दुचाकी वाहने आहेत,” असेही देवेंद्र फडणवीस (Pune Devendra fadnavis on mayor) म्हणाले.

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.