AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळे यांचं उत्तर; म्हणाल्या, शरद पवार यांच्यासारखं…

Supriya Sule on Ajit Pawar Statemet About Sharad Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतमध्ये बोलताना शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी काही आरोप पवारांवर केले. त्यांच्या या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? वाचा...

अजित पवार यांच्या 'त्या' टीकेला सुप्रिया सुळे यांचं उत्तर; म्हणाल्या, शरद पवार यांच्यासारखं...
| Updated on: Dec 03, 2023 | 5:08 PM
Share

अभिजीत पोते, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी | 03 डिसेंबर 2023 : अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरही राष्ट्रवादीच्या खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जी टीका केली. त्यावर मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझा पक्षाला बांधिल आहे. माझ्या कुटुंबाला बांधिल आहे. शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणं गरजेचं आहे. आपल्या नेत्याने स्पष्टीकरण दिल्यानंतर आपण बोलणं, योग्य नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

भाजपवर निशाणा

मी नियमित भ्रष्टजनता पार्टीवर नेहमी टीका करते. अजित पवार गट आणि शिंदे गट यावर मी टीका करणार नाही मात्र भाजपवर मी वैचारिक टीका करते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकी राष्ट्रवादी किती जागा लढणार, यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आम्ही १५ ते १६ जागा लढणार आहोत, असं त्या म्हणाल्या.

बारामतीच्या जागेवर म्हणाल्या…

अजित पवार यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. मला माहिती नाही माझा समोर कोण उमेदवार असणार आहे. आधी लोकसभा निवडणूक जाहीर होऊ द्या… मग विधानसभा निवडणूक होईल. आधी लगीन कोंढाण्याचं…, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

निवडणुकीच्या निकालावर सुळे म्हणाल्या…

आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. अपेक्षा अशी नाही. निवडणुका या स्थानिक पातळीवर असते. या निवडणुक स्थानिक मुद्द्यांवर लढल्या गेल्या. एक्झिट पोल आपण पाहिलं आहेत. थोड्या वेळात निकाल क्लिअर होईल. संध्याकाळपर्यंत कळेल की किती मतं कुणाला मिळाली आहेत. राजस्थान मध्यप्रदेश मागच्यावेळी काँग्रेस जिंकलं होतं. भाजप हरलं होतं. मात्र लोकसभेला वेगळं चित्र समोर आलं होतं, असं त्यांनी म्हटलं.

शिवराज सिंह यांचं कौतुक

मध्यप्रदेश मध्ये त्यांनी लाडली नावाची स्कीम चालली आणि शिवराज सिंग यांच्यामुळे भाजपला फायदा झाला. तेलंगणा मध्ये रेवांत रेड्डी यांनी लीड घेतला हे खूप चांगलं आहे. ती स्कीम मध्यप्रदेशमध्ये चालली. पण तेलंगणात चालली नाही. मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह यांची लीडर शिप दिसली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुण्यातील कोथरूडमध्ये गावरान खाद्य महोत्सव भरला आहे. त्याला सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. बचत गटाच्या माध्यमातून चांगला खाद्य मोहोत्सव भरवला आहे. महिलांना भेटल्यावर मला आनंद झाला, असं यावेळी त्या म्हणाल्या.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.