विरोधी पक्षनेता ते मंत्री… विखेंचा चौथा नंबर, सुरुवात तर पवारांपासून!

विरोधी पक्षनेता ते मंत्री असा प्रवास करणारे राधाकृष्ण विखे पाटील हे काही महाराष्ट्राच्या राजकारणातले पहिले नेते नाहीत. याआधीही तीन बड्या नेत्यांनी असा प्रवास केला आहे.

विरोधी पक्षनेता ते मंत्री... विखेंचा चौथा नंबर, सुरुवात तर पवारांपासून!
Follow us
| Updated on: Jun 17, 2019 | 4:15 PM

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काल (16 जून) पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वात लक्षवेधक चेहरा ठरला तो राधाकृष्ण विखे पाटील यांचा. याचे कारण गेल्या साडेचार वर्षात विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करुन, थेट मंत्रिपदापर्यंत मजल मारली. यानंतर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळासर सर्वच ठिकाणी विखेंच्या ‘विरोधी पक्षनेता ते मंत्री’ या प्रवासावर खुसामदार चर्चा सुरु झाली.

विरोधी पक्षनेता ते मंत्री असा प्रवास करणारे राधाकृष्ण विखे पाटील हे काही महाराष्ट्राच्या राजकारणातले पहिले नेते नाहीत. याआधीही तीन बड्या नेत्यांनी असा प्रवास केला आहे. या सर्वात मोठा चेहरा म्हणजे दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार हे आहेत.

शरद पवारांनी खऱ्या अर्थाने ‘विरोधी पक्षनेता ते मंत्री’ या प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी. त्यानंतर चारच वर्षांपूर्वी असा पराक्रम केला होत विद्यमान आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. आणि आता राधाकृष्ण विखे पाटील. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांच्या ‘विरोधी पक्षनेता ते मंत्री’ या प्रवासावर तोंडसुख घेणाऱ्यांनी आधीचा इतिहासही नक्कीच पाहायला हवा. त्यासाठी थोडं सविस्तर :

शरद पवार : 1985 साली शरद पवार यांच्या नेतृत्वात समाजवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले होते. त्यावेळी शरद पवार हे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर दोन वर्षांनी 1987 साली शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण केलं आणि 1988 साली शरद पवार थेट मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

नारायण राणे : नारायण राणे यांनी 2005 साली शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. मात्र, त्यावेळी नारायण राणे हे शिवसेनेकडून विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना तातडीने काँग्रेसकडून मंत्रिपदी देण्यात आले होते.  

एकनाथ शिंदे : 2014 ची विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले होते. त्यानंतर भाजपच्या सर्वाधिक जागा आल्या होत्या. मात्र, शिवसेना द्वितीय क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यामुळे शिवसेनेकडून विधानसभेत एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते म्हणून निवडले गेले. मात्र, पुढच्याच मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने सत्तेत प्रवेश केला आणि एकनाथ शिंदे हे मंत्रिपदी विराजमान झाले.

राधाकृष्ण विखे पाटील : शिवसेनेने सत्तेत प्रवेश केल्यानंतर संख्याबलानुसार विरोधी पक्षनेतेपद अर्थात काँग्रेसकडे आलं. काँग्रेसकडून राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. मात्र, पुढे मुलगा सुजय विखे यांना लोकसभेचं तिकीट काँग्रेस-राष्ट्रवादीने नाकारल्याने, राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि काल (16 जून) झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात विखेंना मंत्रिपदही देण्यात आले. विखे विद्यमान सरकारमध्ये गृहनिर्माण खाते सांभाळणार आहेत.

एकंदरीत, राधाकृष्ण विखे पाटील हे काही पहिले असे मंत्री नाहीत, ज्यांनी एकाच सत्ताकाळात ‘विरोधी पक्षनेता ते मंत्री’ असा प्रवास केला आहे. याआधी शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यानेही अशी वाट चोखळली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.