Rahul Gandhi ED Inquiry : ‘कुत्ते की मौत मरेगा…’ राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरुन काँग्रेस नेते घसरले, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका

महाराष्ट्रातही नागपूरमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी नागपूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी मोदींवर जहरी टीका केलीय. तिकडे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही मोदींवर जोरदार टीका केलीय.

Rahul Gandhi ED Inquiry : 'कुत्ते की मौत मरेगा...' राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरुन काँग्रेस नेते घसरले, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका
राहुल गांधी, नरेंद्र मोदीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 4:12 PM

नागपूर : नॅशनल हेराल्ड केस (National Herald case) प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची चौकशी सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. देशात विविध राज्यात काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात येतेय. अशास्थितीत आता काँग्रेस नेत्यांचा तोल गेल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही नागपूरमध्ये (Nagpur) काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी नागपूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी मोदींवर जहरी टीका केलीय. तिकडे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही मोदींवर जोरदार टीका केलीय.

नागपूरमध्ये ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं. या आंदोलनावेळी बोलताना शेख हुसेन यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. शेख हुसेन म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी तेरा वही हाल होगा, जैसे कुत्ते की मौत होती है, ऐसे नरेंद्र मोदी की मौत होगी’. भले यासाठी मला हजार नोटीस मिळतील. मला त्याची चिंता नाही. आम्ही लढत आलो आहोत आणि पुढेही लढत राहू. शेख हुसेन यांनी मोदींवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हुसेन यांच्या या टीकेवर भाजप नेत्यांनी तीव्र विरोध केलाय. या वक्तव्यावर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. भाजपने हुसेन यांच्या अटकेची मागणी केलीय. तसंच त्यांना अटक झाली नाही तर भाजपने आंदोलनाचा इशारा दिलाय.

हे सुद्धा वाचा

भुपेश बघेल यांचा मोदींवर हल्लाबोल

तिकडे काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय. आम्ही आता आमचे कर्मचारी AICC कार्यालयही घेऊन येऊ शकत नाही. फक्त दोन मुख्यमंत्रीच इथे येऊ शकतात, अन्य कुणाला प्रवेश नाही असं आम्हाला सांगण्यात आलंय. त्यांनी राहुल गांधींच्या जबड्यात हात घालण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना हे महागात पडेल, असा इशारा बघेल यांनी दिलाय.

राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी ईडी चौकशी

राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी

राहुल गांधी यांची आज सलग तिसऱ्या दिवशी ईडी चौकशी सुरु आहे. कथित नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची चौकशी करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी साडे साठ तास, दुसऱ्या दिवशी तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा एकदा राहुल गांधींना ईडी चौकशीला बोलावण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बनले आहेत. आज दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हिंसक आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावर टायर जाळण्यात आले.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.