“आमची मनं जुळलीत, बाकी सगळं आपोआप जुळून येईल”, महायुतीच्या मोर्चेबांधणीवर बड्या नेत्याचं विधान

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 25, 2022 | 10:28 AM

महायुतीच्या मोर्चेबांधणीवर मनसेच्या बड्या नेत्याचं विधान, काय म्हणालेत? पाहा...

आमची मनं जुळलीत, बाकी सगळं आपोआप जुळून येईल, महायुतीच्या मोर्चेबांधणीवर बड्या नेत्याचं विधान

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून काही राजकीय भेटींची महाराष्ट्रभर चर्चा होतेय. या भेटी म्हणजे राजकीय बदलांचे उघड संकेत आहेत. भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीत आणखी एका पक्ष येऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. राज ठाकरेंचा (Raj Thackeray) मनसे पक्ष महायुतीचा भाग होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यावर केंद्रीय मंत्री कपील पाटील (Kapil Patil) आणि मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी भाष्य केलंय.

“आमची मनं जुळली आहेत, बाकी सगळं आपोआप जुळून येईल”, असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

महायुती झाल्यास सगळ्यांनाच आनंद होईल. फायदा होईल, असं कपील पाटील म्हणालेत.

मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी वाढत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या दीपोत्सवाला हजेरी लावली. त्यानंतर ही महायुती होणं ‘पक्कं’ झाल्याचं बोललं जाऊ लागलं. आता यावर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटीलही यावर बोलते झालेत.

भाजप, मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची महाविकास आघाडी असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव असेल तर महाराष्ट्रात भाजपचे 13 कोर कमिटीचे सदस्य बसून निर्णय करतात.या विषयासाठी कोर कमिटीची कोणतीही बैठक झालेली नाही. असा कोणताही प्रस्ताव चर्चेला आला नाही, त्यामुळे ज्या प्रस्तावाची चर्चाच नाही. त्या प्रस्तावाबद्दल मी काय बोलणार?, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI