AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे? राज ठाकरे यांच्याकडून मोठा संशय, थेट…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली असताच आता राज ठाकरे यांनी थेट मोठे विधान केले. रोहित पवार राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाली.

धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे? राज ठाकरे यांच्याकडून मोठा संशय, थेट...
Raj Thackeray
| Updated on: Feb 27, 2026 | 2:01 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मोठी खळबळ उडाली. त्यामध्येच अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघातात गंभीर आरोप करताना दिसत आहेत. सकाळीच त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर रोहित पवार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. तुम्ही सत्तेत आहात एफआयआर नोंदवण्याकरिता किमान मदत करा, असे रोहित पवार यांनी थेट म्हटले होते. राज ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली हे सांगतानाही रोहित पवार यांनी सांगितली. रोहित पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अत्यंत मोठे विधान केले. त्यांनी थेट सरकार संशयाची भूत फिरवत असल्याचे म्हटले. हा राजकारणाच्या पलिकडला विषय असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले.

राज ठाकरे यांनी मोठा संशय व्यक्त करत म्हटले की, अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे? राज ठाकरे यांनी केलेल्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. पुढे राज ठाकरे यांनी म्हटले की, मध्यंतरी मी कुणाशी तरी बोललो की अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला हे महाराष्ट्राला समजत नाहीये. रोहित पवारांनी टेक्निकल गोष्टी सांगितल्या. मला एकच गोष्ट जाणवली. त्यांनी तीन ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला.

पण तिन्ही ठिकाणी सरकारकडून एफआयआर घेतला नाही. पोलिसांना सांगितले गेले. इथेच मला संशयाची सूई वाटली. सरकारला का वाटलं. एफआयआर का घेतला नाही. मरीन ड्राईव्हला गेल्यावर अधिकारी एफआयआर लिहून घेत होते. तितक्यात डीसीपी आले. त्यांनी सांगितलं एफआयआर घ्यायचा नाही. हे कशासाठी. घरच्यांना संशय असेल, चौकशी नीट व्हावी यासाठी एफआयआर करायचा असेल तर अडथळे का केले जातात.

सुनेत्रा पवार यांनी याचा विचार करावा. त्यांचेच पती गेले. सरकारकडून दबाब येतो हे त्यांनी पाहावं, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सातत्याने आक्रमक होताना दिसत आहेत. कालच सुनेत्रा पवार यांनी पक्षाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. राज ठाकरे यांनी रोहित पवार प्रकरणात मोठा संशय बोलून दाखवला.

Follow Us
सरकारकडून अडथळे का आणले जाताय? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
सरकारकडून अडथळे का आणले जाताय? राज ठाकरेंचा संतप्त सवाल.
आमच्यावर आणि भाजपवर आता बोलू नये! बावनकुळेंचा रोहित पवारांना सल्ला
आमच्यावर आणि भाजपवर आता बोलू नये! बावनकुळेंचा रोहित पवारांना सल्ला.
तुमच्याही आयफोनवर व्हॉट्सॲप चालत नाहीय का? असेल हे कारण
तुमच्याही आयफोनवर व्हॉट्सॲप चालत नाहीय का? असेल हे कारण.
दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, काकींना..;रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, काकींना..;रोहित पवारांचं मोठं वक्तव्य.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी अन् आंदोलन
विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी अन् आंदोलन.
थातूरमातूर रिपोर्ट दिला तर..; ठाकरेंच्या भेटीनंतर रोहित पवारांचा इशारा
थातूरमातूर रिपोर्ट दिला तर..; ठाकरेंच्या भेटीनंतर रोहित पवारांचा इशारा.
मराठीचा वापर दैनंदिन व्यवहारात वाढवणे काळाची गरज - सुनेत्रा पवार
मराठीचा वापर दैनंदिन व्यवहारात वाढवणे काळाची गरज - सुनेत्रा पवार.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वभाषेचा स्वाभिमान शिकवला - देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वभाषेचा स्वाभिमान शिकवला - देवेंद्र फडणवीस.
कधी-कधी राजकीय नेतेही विनोदाचा भाग होतात! शिंदेंचा मिश्किल टोला
कधी-कधी राजकीय नेतेही विनोदाचा भाग होतात! शिंदेंचा मिश्किल टोला.
मराठी भाषा भवनाला विलंब का झाला याचा...; उदय सामंतांचं मोठं विधान
मराठी भाषा भवनाला विलंब का झाला याचा...; उदय सामंतांचं मोठं विधान.