राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयातील शस्त्रक्रिया पूर्ण, आता नेमकी कशी आहे तब्येत?

Raj thackeray Health Update : राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण

राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयातील शस्त्रक्रिया पूर्ण, आता नेमकी कशी आहे तब्येत?
आयेशा सय्यद

|

Jun 20, 2022 | 3:19 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अखेर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला होता. हिप बोनची (Hip bone) शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला होता. खरंतर 1 तारखेलाच त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. मात्र कोरोनाची लागण झाल्यानं त्यांची ही शस्त्रक्रिया लांबणीवर पडली होती. अखेर लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. दरम्यान, दुपारी चार वाजता त्यांच्या प्रकृती बाबत लिलावती रुग्णालयाच्या वतीने सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया पूर्ण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला होता. हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला होता. खरंतर 1 तारखेलाच त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. मात्र कोरोनाची लागण झाल्यानं त्यांची ही शस्त्रक्रिया लांबणीवर पडली होती. अखेर लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली.

कोरोनामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलली

1 जूनलाच राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आज अखेर लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी काही चाचण्या करण्यासाठी राज ठाकरेंना काल (शनिवार) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आज ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंच्या निरोगी आयुष्यासाठी कार्यकर्त्यांचं साकडं

राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. पण त्याआधी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी देवाकडे साकडं घातलं. मोरया गोसावी गणपती मंदिरात आरती करून प्रार्थना केली. पिंपरी चिंचवड मनसेचे सचिन चिखले यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते. तसंच पुण्यातील भीमाशंकर इथेही पूजा पार पडली. राज ठाकरेंवरील शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी भीमाशंकरमध्ये अभिषेक करण्यात आला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें