राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले आहेत. मुलगा अमितच्या लग्नाची पत्रिका राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरेंना देणार आहेत. लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे विविध नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्याचाच भाग म्हणून ते त्यांचे बंधू उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यासाठी गेले. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे […]

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले आहेत. मुलगा अमितच्या लग्नाची पत्रिका राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरेंना देणार आहेत. लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे विविध नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्याचाच भाग म्हणून ते त्यांचे बंधू उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यासाठी गेले.

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं 27 जानेवारीला लग्न आहे. ठाकरे बंधूंचं रक्ताचं नातं असलं तरी त्यांचे राजकीय संबंध मात्र चांगले नाहीत. गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मोठं अंतर आलं. पण शेवटी लग्नाच्या निमित्ताने का होईना दोघांची भेट होत आहे. वाचाऐतिहासिक! राज ठाकरे राहुल गांधींना भेटणार, वेळ-ठिकाण ठरलं!

दरम्यान, 8 जानेवारीला राज ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवराही या भेटीसाठी उपस्थित असतील. अमितच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे दिल्लीला जातील.

अमितचं लग्न 27 जानेवारी 2019 रोजी मुंबईत होणार आहे. लोअर परळ इथल्या सेंट रेजिस इथं हा लग्नसोहळा पार पडेल. अमित आपली मैत्रीण मिताली बोरुडेसोबत लगीनगाठ बांधणार आहे. राज ठाकरे यांनी काल अमितची लग्नपत्रिका नाशिकमधील सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ठेवली. अमित ठाकरेंच्या लग्नपत्रिकेत 5 नावं आहेत.अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला.

शिवसेना सोडल्यापासून राज आणि उद्धव यांच्या भेटी

यापूर्वी जुलै 2016 मध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले होते. या भेटीचं नेमकं कारण समोर आलं नव्हतं.

चार वर्ष अगोदर म्हणजे 2012 मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या निमित्ताने दोघे भेटले होते. राज ठाकरे यांनी कुटुंबासह उद्धव ठाकरे यांची लिलावती रुग्णालयात भेट घेतली. छातीत दुखू लागल्याने उद्धव ठाकरेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज यांनी पत्नीसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज-उद्धव यांच्या भेटीची ही त्यावेळची केवळ दुसरी भेट होती.

23 नोव्हेंबर 2008 रोजी राज ठाकरे बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्याच्या निमित्ताने ‘मातोश्री’वर गेले होते. यावेळीही राज आणि उद्धव यांची भेट झाली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.