AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे अ‍ॅक्शन मोडमध्ये, ग्रामपंचायत निवडणुकांवर बैठक, इंजिन पुन्हा रुळावर येणार?

ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे

मनसे अ‍ॅक्शन मोडमध्ये, ग्रामपंचायत निवडणुकांवर बैठक, इंजिन पुन्हा रुळावर येणार?
Raj Thackeray
Anish Bendre
Anish Bendre | Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 8:12 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपला अडचणीत आणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरेंचा पक्ष हा फक्त मुंबई, नाशिक, ठाणे पुण्यासारख्या मोठ्या शहरात अस्तित्वात आहे, अशी टीका नेहमी केली जाते. पण, यावेळी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने मनसे (MNS) पहिल्यांदाच गावपातळीच्या राजकारणात आपली ताकद आजमावत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने मनसेनी यासंदर्भात खलबतं करण्यासाठी बैठक बोलावली आहे. (Raj Thackeray MNS meeting for Gram Panchayat Election)

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज ठाकरेंच्या ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या घोषणेमुळे मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष वेगाने तयारीला लागले आहेत.

राज ठाकरे मेळावा घेणार

पुणे जिल्ह्यातील 1400 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मनसेच्या पॅनेलतर्फे उमेदवार मैदानात असतील. त्यातच राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तालुकास्तरावर बैठका, मेळावे घेण्याचे आदेश दिले आहेत. तर राज ठाकरे 23 तारखेनंतर स्वत: पुणे जिल्ह्यात मेळावा घेणार आहेत.

रिव्हर्स मोडवरील मनसेचे इंजिन रुळावर येणार?

मनसे कार्यकर्त्यांच्या बैठका जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात सुरु झाल्यात. सध्या रिव्हर्स मोडवर असलेले मनसेचे इंजिन ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नशीब आजमावत पुन्हा एकदा रुळावर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हणून मनसेने आपला मोर्चा गाव पातळीवर वळवलाय.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात निवडणुकीचं महत्व वेगळं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपची ताकद गाव पातळीवर आहे. ग्रामीण भागात मनसेचे काम, मनसेचे संघटन उभ करण्याची संधी आहे. यानिमित्ताने मनसेला ग्रामीण भागातील पाया भक्कम करता येऊ शकतो, राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

मनसेने शड्डू ठोकला, 4134 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणार

भाजपच्या गडात मनसेची ताकद, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसैनिक आक्रमक

(Raj Thackeray MNS meeting for Gram Panchayat Election)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...