Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत’, राज ठाकरेंचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर

अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.

'मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत', राज ठाकरेंचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 4:54 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीवाद वाढला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं लेखन वाचण्याचा सल्ला देण्यात आला. राष्ट्रवादीच्या या सल्ल्यानंतर आता राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले. (MNS president Raj Thackeray’s reply to NCP and Sambhaji Brigade)

आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असं मी एकटाच बोललो. मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला. मी सर्वांची पुस्तकं वाचलेत. प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असा जोरदार टोला राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावलाय.

‘..मग काय भूमिका बदलली काय?’

नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले, जात-धर्माच्या आधारे नाही. लोक विकासाच्या मुद्द्यावरही मतदान करतात हे दिसलं. पण मी मुलाखतीत एका मुद्द्याच्या अनुषंगाने बोललो. आता काय चाललंय तर जातीचं वातावरण तयार करण्यात येतंय. मी शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली होती. त्यावर पत्रकार म्हणाले, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. पण त्याचा काय संबंध. मी त्यांच्या वाढदिवसाला भाषण केलं होतं. त्याची सुरुवात होती, आजचा दिवस पाहता काही गोष्टी या राखूनच ठेवल्या पाहिजेत, वाढदिवशी आपण चांगलं बोलतो. मग म्हणजे काय भूमिका बदलली का? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी विचारलाय.

‘बाबासाहेबांना ब्राह्मण किंवा पवारांना मराठा म्हणून भेटत नाही’

बाबासाहेब पुरंदरेंना मी इतिहास संशोधक म्हणून जातो, ब्राह्मण म्हणून नाही. पवारसाहेबांकडे मी मराठा म्हणून जात नाही. कुणाच्याही घरी आपण जात म्हणून जातो का? वॉर्डनिहाय आरक्षणापेक्षा स्त्री पुरुष हेच आरक्षण असलं पाहिजे. विरोध काय करणार, वरती जे ठरवात तेच करावं लागतं. अजून तुमचं नशीब तुमच्या क्षेत्रात मीडियात अजून आरक्षण नाही. मी काय वाचतो आणि काय वाचलंय हे मला माहितीय, माझ्या पक्षाला माहितीय, मला मोजायचा प्रयत्न करु नये. बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणता, पण सिद्ध करा ना.. ५० साली पहिलं पुस्तक आलं त्यावेळी तुम्हाला चुकीचा इतिहास कळला नाही का? ज्याचं काही आकलन नाही, त्याच्यावर काय बोलायचं? कोण जेम्स लेन? कुठे आहे सध्या? आग लावायला आला, त्याच वेळी का आला? हे सर्व वेल डिझाईन्ड आहे, असा गंभीर आरोपही राज यांनी यावेळी केलाय.

इतर बातम्या :

पारनेर तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपवरुन मोठी खळबळ; आरोपांबाबत आमदार निलेश लंकेंचं उत्तर काय?

त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो; खासदार संभाजी छत्रपतींचा मोठा गौप्यस्फोट

MNS president Raj Thackeray’s reply to NCP and Sambhaji Brigade

नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले.
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या.
सालियन प्रकरणात करूणा शर्माची उडी, 'त्या' प्रकरणाचा उल्लेख करत...
सालियन प्रकरणात करूणा शर्माची उडी, 'त्या' प्रकरणाचा उल्लेख करत....
सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?
सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?.
नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा
नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा.
बच्चू कडुंचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन
बच्चू कडुंचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन.
मुलाला वाचवा... ठाकरेंचा फोन होता, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुलाला वाचवा... ठाकरेंचा फोन होता, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट.
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, 'आता जे होईल ते...'
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, 'आता जे होईल ते...'.