बळीराजाचा रोष दाबण्यासाठीच एनसीबीने दीपिकाला आंदोलनाच्या दिवशी चौकशीला बोलावलं : राजू शेट्टी

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम |

Updated on: Sep 24, 2020 | 9:28 PM

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणला 25 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावण्यावरुन मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे (Raju Shetti criticize Modi Government on NCB summons of Deepika Padukone).

बळीराजाचा रोष दाबण्यासाठीच एनसीबीने दीपिकाला आंदोलनाच्या दिवशी चौकशीला बोलावलं : राजू शेट्टी

मुंबई : शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणला 25 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावण्यावरुन मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे (Raju Shetti criticize Modi Government on NCB summons of Deepika Padukone). याच दिवशी देशभरातील शेतकरी केंद्राच्या नव्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. मात्र, त्यांचा तो सरकारविरोधी रोष दाबण्यासाठीच एनसीबीने दीपिकाला त्या दिवशी चौकशीला बोलावल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय.

राजू शेट्टी म्हणाले, “दिपीका पदुकोणला NCB ने 25 सप्टेंबरलाच चौकशीसाठी बोलावले आहे. कारण याच दिवशी देशभरातील शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. माध्यमांनी आंदोलन करणाऱ्या करपलेल्या चेहऱ्यांच्या शेतकऱ्यांना दाखवण्याऐवजी दीपिकाच्या चेहऱ्यावरच फोकस करुन बळीराजाचा रोष दाबण्यासाठीचा हा खटाटोप आहे.”

दरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीने समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोणलाही उद्या (25 सप्टेंबरला) चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावलं होतं. मात्र, दीपिकाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आपण 26 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं कळवलं आहे. सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण दुपारी मुंबईत दाखल झाली. तिचा पती अभिनेता रणवीर सिंगही वकिलांची जुळवाजुळव करत आहे.

दीपिका पदुकोण आज (24 सप्टेंबर) दुपारी दीड वाजता मुंबईत दाखल झाली. ती खासगी चार्टर्ड विमानाने गोव्याहून मुंबईला आली. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर दीपिका सर्वात आधी वरळीतील ब्योमाँड टॉवरमध्ये असलेल्या आपल्या घरी गेली. सध्या ती या प्रकरणातील पुढील रणनीती ठरवत आहे.

संबंधित बातम्या :

Deepika Padukone | समन्सनंतर दीपिकाने एनसीबी चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ कळवली

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी

दगड आमच्या हातात अन् काचा तुमच्या, राजू शेट्टींचा केंद्र सरकारला इशारा

ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण रेवनाथची चर्चाच नाही : राजू शेट्टी

संबंधित व्हिडीओ :

Raju Shetti criticize Modi Government on NCB summons of Deepika Padukone

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI