‘हे सगळे तथाकथित सेलिब्रिटी, सरकारचे अनुदान घ्यायला सोकावले’, राजू शेट्टींचं चौकशीला समर्थन

तथाकथित सेलिब्रिटींकडून देशभक्ती शिकण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. सरकारनं जरुर त्यांनी चौकशी करावी. त्याचबरोबर त्यांची आर्थिक चौकशीही करुन त्यांच्या आर्थिक भानगडी बाहेर काढाव्यात', अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

'हे सगळे तथाकथित सेलिब्रिटी, सरकारचे अनुदान घ्यायला सोकावले', राजू शेट्टींचं चौकशीला समर्थन
राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

इंदापूर : सेलिब्रिटींच्या ट्वीटवरुन जोरदार राजकारण रंगलेलं असताना आता सेलिब्रिटींच्या आर्थिक भानगडींची चौकशी करण्याची मागणी माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलीय. शेट्टी आज इंदापुरातील कोर्टात आले होते. राजू शेट्टी यांच्यावर वॉरंट निघालं होतं. त्यावर जामीन मिळवण्यासाठी ते कोर्टात आले होते. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना त्यांनी ट्वीटच्या राजकारणावर भाष्य केलं.(Raju Shetty’s demand for financial inquiries along with celebrity tweets)

शेतकरी आंदोलनाबा पाठिंबा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी ट्वीट केलं होतं. त्याला भारतातील काही सेलिब्रिटींनी प्रत्युत्तर दिलं. भारतातील सेलिब्रिटिंनी केलेल्या ट्वीटमध्ये साम्य असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. त्यावर सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलीय. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगलं आहे. सेलिब्रिटींची चौकशी करण्याच्या निर्णयावर भाजप नेत्यांनी गृहमंत्र्यांवर टीकास्त्र डागलं आहे. तर राजू शेट्टी यांनी मात्र या चौकशीच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

त्यांच्या आर्थिक भानगडी बाहेर काढा- शेट्टी

‘सगळेच तथाकथित सेलिब्रिटी सरकारचं अनुदान घ्यायला सोकलेले आहेत. ज्यांना जनतेनं मोठं केलं आणि आज शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जनआंदोलन केलं असताना हे सरकारची बाजू घेत आहेत. त्या तथाकथित सेलिब्रिटींकडून देशभक्ती शिकण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. सरकारनं जरुर त्यांनी चौकशी करावी. त्याचबरोबर त्यांची आर्थिक चौकशीही करुन त्यांच्या आर्थिक भानगडी बाहेर काढाव्यात’, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

अनिल देशमुखांचा निर्णय काय?

पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देत अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश देण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचं कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असं सचिन सावंत यांनी सांगितलं.

भातखळकरांची देशमुखांवर टीका

भाजपचे आमदार अतुल भातखळर यांनी अनिल देशमुखांवर जहरी टीका केलीय. “अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे.देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्म विभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा इशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते.”, असं वक्तव्य अतुल भातखळकरांनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

“भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत”, देवेंद्र फडणवीसांसंह भाजप आक्रमक

सेलिब्रिटीजच्या ‘त्या’ ट्विटची चौकशी होणार; अनिल देशमुखांचे आदेश

Raju Shetty’s demand for financial inquiries along with celebrity tweets

Published On - 5:34 pm, Tue, 9 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI