AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसकडून राज्यसभेचा उमेदवार जाहीर, विधान परिषदेत पराभूत झालेल्या उमेदवारास संधी कारण…

Rajya Sabha Election congress list 2024 | काँग्रेसने जाहीर केलेल्या चार उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे आहेत. तसेच राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंग, हिमाचल प्रदेशातून अभिषक मनू संघवी यांना उमेदवारी दिली.

काँग्रेसकडून राज्यसभेचा उमेदवार जाहीर, विधान परिषदेत पराभूत झालेल्या उमेदवारास संधी कारण...
sonia gandhi chandrakant handore
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 14, 2024 | 12:13 PM
Share

मुंबई, दि. 14 फेब्रुवारी 2024 | राज्यसभा निवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून उमेदवार जाहीर झाला आहे. काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. यामुळे हा उमेदवार महाविकास आघाडीचा आहे. महाविकास आघाडीतून केवळ एकच जागा निवडून येऊ शकते. यामुळे काँग्रेसला ही उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. दिल्लीवरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले.

का दिली हंडोरे यांना उमेदवारी

जून २०२२ मध्ये राज्यात विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिले होते. त्यात भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश होता. या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेसला मोठा धक्का बसला. भाजपने प्रसाद लाड या पाचव्या उमेदवार निवडून आणले होते. त्याचवेळी काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले. परंतु चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते.

दलित समाज नाराज

चंद्रकांत हंडोरे त्यांनी विलासराव देशमुख मंत्रीमंडळात होते. १९९२ ते १९९३ या कालावधीसाठी त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होती. हंडोरे हे आंबेडकरवादी आणि सामाजिक-राजकीय संघटना “भीम शक्ती”चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. दलित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. विधान परिषदेत त्यांचा पराभव झाल्यामुळे दलित समाजात नाराजी होती. ही नाराजी दूर करण्यासाठी आता काँग्रेसने म्हणजे महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिली आहे. परंतु यंदाही भाजप सहावी जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे हंडोरे यांच्यासमोर आव्हान कायम असणार आहे.

भाई जगताप यांना ठरवले दोषी

विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाचा ठपका चौकशी समितीनेही भाई जगताप यांच्यावर ठेवला होता. दिलेल्या कोट्यापेक्षा पक्षाची अधिकची मते मिळवून भाई जगताप स्वत: विजयी झाले. पक्षाचे पहिल्या क्रमांकाचे हंडोरे यांचा पराभव झाल्यामुळे भाई जगताप यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदही सोडावे लागले होते. काँग्रेसने जाहीर केलेल्या चार उमेदवारांमध्ये चंद्रकांत हंडोरे यांच्यासह राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंग, हिमाचल प्रदेशातून अभिषक मनू संघवी यांना उमेदवारी दिली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच