Rajya Sabha Election 2022 : मविआला हॉटेलमध्ये आमदार ठेवण्याची वेळ का आली? नाराजी? संजय राऊत म्हणतात, आमदारांना काऊंन्सलिंगची गरज

आम्ही घाबरलेलो नाही, मात्र ही निवडणूक ही जास्त तांत्रिक असल्यामुळे आमदारांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्या मार्गदर्शनासाठी ही बैठक हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले. तसेच मित्रपक्षांच्या नाराजीबाबत आणि त्यांच्या भूमिकेबाबतही संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे.

Rajya Sabha Election 2022 : मविआला हॉटेलमध्ये आमदार ठेवण्याची वेळ का आली? नाराजी? संजय राऊत म्हणतात, आमदारांना काऊंन्सलिंगची गरज
संजय राऊतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 4:36 PM

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) सध्या हलचाली वाढल्या आहेत. शिवसेनेकडून (Shivsena) आमदारांना हॉटेलात ठेवण्यात आलं आहे. तसेच आज आमदारांच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आलं आहे. मित्रपक्षांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे शिवसेना तणावाखाली आहे का? मविआला हॉटेलमध्ये आमदार ठेवण्याची वेळ का आली? असे सवाल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना केल्यानंतर आता त्यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय. आम्ही घाबरलेलो नाही, मात्र ही निवडणूक ही जास्त तांत्रिक असल्यामुळे आमदारांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्या मार्गदर्शनासाठी ही बैठक हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले. तसेच मित्रपक्षांच्या नाराजीबाबत आणि त्यांच्या भूमिकेबाबतही संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे. लहान पक्षांच्या काही मागण्या असतात, अनेकदा त्या मागण्या मान्य होत नाही, हे राऊतांनीही खुलेपणे मान्य केलं आहे.

मित्रपक्ष आजही आमच्याबरोबरच

तसेच ही कामं मार्गी लावण्याची संधी असते. ते काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. हे सर्व पक्ष आजही आमच्या बरोबरच आहेत. . आघाडीच्या स्थापनेनंतर ही एकमेकांची शक्ती दाखवण्याची पहिली संधी आहे.  हे आम्ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेतलंय, आम्हाला पाठिंबा देणाऱ्या लोकांशी आमचा संवाद सुरू, आमच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नाही, आम्ही रिलॅक्स आहोत, असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच निवडणुकीत सर्व पत्ते उघडायचे नसतात, दहा जूनला मतमोजणी झाली असेल तेव्हा सेनेचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीत जिंकतील, तर आघाडीच्या चारही जागा जिंकून येतील, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच आम्हाला फोडाफोडी करण्याची अजिबात गरज नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या गोटातल्या हलचाली वाढल्या

शिवसेना आणि भाजप यांच्याकडून आता आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून अपक्ष आमदार आणि मित्रपक्षांच्या आमदारांच्या घराचे उंबर झिजवले जात आहे. मात्र मित्रपक्षांनीही सावध भूमिका घेत अजूनही आपल्या भूमिका स्पष्ट केल्या नाहीत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाली आहे. भाजपकडून सहाव्या जागेवर धनंजय महाडिक यांना निवडणून आणण्यासाठी जोर लावला जातोय तर शिवसेनेकडून संजय पवार यांना मैदानात उतरवण्यात आलंय. आता संजय राऊत सांगतात ते किती खरं ठरतंय हे निवडणुकीनंतरच कळेल. मात्र सध्या तरी संभाव्या धोका ओळखून शिवसेना कामाला लागली आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.