राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, महाराष्ट्रातील 7 तर देशातील 55 जागांसाठी मतदान

देशभारतील राज्यसभेच्या 55 जागांसाठी येत्या 26 मार्चला मतदान (Rajya Sabha Election) होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांचाही यामध्ये समावेश आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, महाराष्ट्रातील 7 तर देशातील 55 जागांसाठी मतदान
Parliament winter session
Follow us
| Updated on: Feb 25, 2020 | 10:59 AM

नवी दिल्ली : देशभारतील राज्यसभेच्या 55 जागांसाठी येत्या 26 मार्चला मतदान (Rajya Sabha Election) होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांचाही यामध्ये समावेश आहे. एकूण 17 राज्यांतून 55 सदस्य राज्यसभेवर निवडून जाणरा आहेत. आजपासून महिनाभराने मतदान (Rajya Sabha Election) तर त्याच दिवशी म्हणजे 26 मार्चला संध्याकाळी 5 वाजता निकाल जाहीर होईल. राज्यसभेतून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या सात जागांसह देशातील 55 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे.

महाविकास आघाडीमुळे चित्र बदलणार?

राज्यात महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर राजकारण बदललं आहे. येत्या राज्यसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे. त्यामुळे 7 पैकी 5 जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभेच्या आमदारांच्या मतदानातून राज्यसभेवर 7 जण निवडून जाणार असून त्यात 5 जागा अपक्षांच्या मदतीनं महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची 37 मतं गरजेची आहेत. त्यामुळं आघाडीचे 4 तर भाजपचे 2 उमेदवार निवडून येतील. राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.

राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. शरद पवार वगळता या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी द्यायचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न असणार आहे.

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे (राष्ट्रवादी-शिवसेना 2-2) चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

राज्यसभेच्या सात जागांबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत सातव्या जागेसाठी भाजपने उमेदवार दिल्यास चुरस पाहायला मिळेल. पण छोटे आणि अपक्ष सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहिल्याचं दिसून येतं. त्यामुळे भाजपला एका जागेचा फटका बसू शकतो. (Shivsena leader in race for Rajyasabha)

उदयनराजेंना केंद्रात मंत्रिपद?

मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागांची मुदत संपणार आहे. यावेळी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

संजय काकडेंची तयारी

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी राज्यसभेसाठी फिल्डिंग (Sanjay Kakde Rajya sabha Election) लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या जागेवर संजय काकडे यांनी दावा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपकडून उदयनराजेंना (Udayanraje Bhonsale) राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरु असल्याने, संजय काकडे (Sanjay Kakde Rajya sabha Election) यांनी राजेंपेक्षा आपलीच उमेदवारी कशी सरस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या 

राज्यसभेसाठी शिवसेनेतील जुनेजाणते शर्यतीत, ‘काँग्रेस रिटर्न’ प्रियंका चतुर्वेदीही इच्छुक 

शरद पवार मैदानात, पुन्हा संसदेत जाणार! 

फडणवीसांचा मोहराच राज्यसभेवर जाणार, हरलेल्या व्यक्तीचं पक्षासाठी योगदान काय? काकडेंचा हल्ला

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.