AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election Result : ‘गडबड करणाऱ्यांवर कारवाई होणार, अजून काही नावं समोर येतील’, आशिष जैस्वालांचं वक्तव्य, आपण शिवसैनिक असल्याचाही दावा

सहा अपक्ष आमदारांनी आम्हाला मतदान केलं नाही, असा दावा करत राऊतांनी त्या आमदारांची नावंही घेतली. त्यानंतर आता अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांनीही काही नावं समोर आली आहेत, अजून काही पुढे येतील. ज्यांनी गडबड केली त्यांच्यावर कारवाई होणार, असं म्हटलंय.

Rajya Sabha Election Result : 'गडबड करणाऱ्यांवर कारवाई होणार, अजून काही नावं समोर येतील', आशिष जैस्वालांचं वक्तव्य, आपण शिवसैनिक असल्याचाही दावा
आशिष जैस्वाल, अपक्ष आमदारImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 11, 2022 | 6:37 PM
Share

नागपूर : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपनं महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय. राज्यसभेच्या सहा जागांपैकी तीन जागांवर भाजपनं विजय मिळवलाय. तर तीन जागा महाविकास आघाडीच्या पदरात पडल्या आहेत. सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला, त्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले आहेत. हा पराभव शिवसेना नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. खासदार संजय राऊत यांनी हा पराभव बविआचा तीन आमदार आणि तीन अपक्ष आमदारांच्या माथी मारला आहे. सहा अपक्ष आमदारांनी आम्हाला मतदान केलं नाही, असा दावा करत राऊतांनी त्या आमदारांची नावंही घेतली. त्यानंतर आता अपक्ष आमदार आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) यांनीही काही नावं समोर आली आहेत, अजून काही पुढे येतील. ज्यांनी गडबड केली त्यांच्यावर कारवाई होणार, असं म्हटलंय.

संजय पवार यांचा पराभव दुर्दैवी आहे. मी अपक्ष म्हणून निवडून आलो असलो तरी मी शिवसैनिक आहे. नियतीने आम्हाला हरवलं असलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्यांनी मतदान केलं नसेल ते लपणार नाही. अपक्ष आमदारांनी आपल्या पॅटर्ननुसार मतदान केलं. मात्र, ज्यांनी केलं नाही त्यांचं नाव समोर येईल. काही नावं समोर आली आहेत, काही अजून पुढे येतील. पहिल्या पसंतीस आमचा उमेदवार निवडून येईल असं वाटत होतं. मात्र, तांत्रिक बाबी झाल्या त्यातून आम्ही धडा घेऊन चिंतन करु, असं जैस्वाल म्हणाले.

‘संशयाची सुई अपक्षांवर नाही तर गडबड केली त्यांच्यावर’

जैस्वाल यांनी निवडणुकीपूर्वी आमदार निधी मिळवण्यासाठी मंत्र्यांना त्यांचं कमीशन द्यावं लागतं अशा प्रकारचं वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती. इतकंच नाही तर आपण मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबत तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्याबाबत बोलताना जैस्वाल म्हणाले की, हा पराभव तांत्रिक आहे. या पराभवातून आम्ही शिकलो त्याप्रमाणे पुढे नियोजन करु. सर्व मंत्र्यांबाबत नाराजी नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही तक्रार केली होती. त्यामुळे या नाराजीचा निवडणुकीशी संबंध नाही. आता जागृत होऊन आम्ही काम करु, भविष्यात अजून सुधारणा होईल. अपक्षांवर संशयाची सुई नाही तर ज्यांनी गडबड केली त्यांच्यावर आहे. गडबड केली त्यांना शोधणं कठीण नाही. ज्यांनी गडबड केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशाराही जैस्वाल यांनी दिलाय.

शिवसेनेचे आमच्यावर ऋण- जैस्वाल

मी मुख्यमंत्र्यांना तळागाळातील कार्यकर्त्याला उमेदवारी द्या म्हणून आग्रही होतो. त्यांनी तशाच शिवसैनिकाला उमेदवारी दिली. कोणते अपक्ष फुटले त्यांचे नाव लपवू शकत नाही. शिवसेनेचे आमच्यावर ऋण आहे. आम्ही आदेशानुसारच मतं केलं, असा दावाही जैस्वाल यांनी केलाय.

संजय राऊतांचा अपक्ष आमदारांवर निशाणा

राज्यसभा निवडणुकीत आमची वाट निसरडी होती. ज्या लोकांनी आम्हाला शब्द दिला तो शब्द पाळला गेला असता तर शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला नसता. वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे संजयमामा शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार या आमदारांची मतं आम्हाला मिळाली नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. काही घोड्यांवर जास्त बोली लागली. त्यामुळे बाजारात असलेले घोडे विकले गेले. घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जातात, अशी टीकाही संजय राऊत यांनी नाव घेतलेल्या अपक्ष आमदारांवर केलीय.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....