AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amar Singh Death | राज्यसभा खासदार अमर सिंह यांची झुंज अपयशी, सिंगापूरमधील रुग्णालयात निधन

समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे आज (1 ऑगस्ट) निधन (Rajya Sabha MP Amar Singh has passed away) झाले.

Amar Singh Death | राज्यसभा खासदार अमर सिंह यांची झुंज अपयशी, सिंगापूरमधील रुग्णालयात निधन
| Updated on: Aug 01, 2020 | 7:51 PM
Share

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे आज (1 ऑगस्ट) निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या दीर्घ आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर सिंगापूरमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्तक्रिया करण्यात आली होती. मात्र आज त्यांचे निधन झाले. अमर सिंह यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहत हळहळ व्यक्त केली. (Rajya Sabha MP Amar Singh has passed away)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमर सिंह यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत एक ट्विट केले. “अमर सिंह  हे एक ऊर्जावान नेते होते. गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील राजकारणातील अनेक चढ-उतार त्यांनी फार जवळून पाहिले. ते त्यांच्या जीवनात मैत्रीसाठी ओळखले जातं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मी फार दु:खी झालो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अमर सिंह हे समाजवादी पक्षाचे नेते होते. उत्तर प्रदेशात समाजवादीला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात सिंह यांचा मोठा वाटा होता. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री होती. समाजवादी आणि काँग्रेस पक्षाला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून अमर सिंह यांना मानले जाते.

तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. समाजवादी पक्षाला UPA सोबत जोडून ठेवण्याचा मुख्य काम अमर सिंह करत होते. भारतीय जनता पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडण्यात अमर सिंह यांनी मोठी भूमिका बजावली होती. सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून अमर सिंह यांनी भाजपसह त्यांच्या मित्रपक्षाचे अनेक खासदार आपल्या बाजूने केले होते.

कोण होते अमरसिंह?

  • समाजवादी पार्टीचे सध्याचे राज्यसभेचे खासदार
  • यूपीएच्या काळात अमरसिंहांचा दिल्लीत दबदबा
  • मुलायमसिंह यांच्या जवळचे पण अखिलेशसोबत फार जमलं नाही.
  • बॉलिवूडमध्येही दबदबा, अमिताभ बच्चन यांचे खास दोस्त
  • सहारा ग्रुपसह अंबानी आणि इतर उद्योगपतींशीही संबंध
  • जवळपास सर्वच पक्षात अमरसिंहांची खास दोस्ती
  • डाव्यांनी पाठिंबा काढला त्यावेळेस अमरसिंहांनी यूपीएला वाचवलं
  • राडिया टेप्सच्या वादात सापडले, क्लिंटन फाऊंडेशनला पैसे देण्यावरही वाद (Rajya Sabha MP Amar Singh has passed away)

संबंधित बातम्या :

अंथरुणाला खिळलेल्या अमर सिंहांची मृत्यूशी झुंज, अमिताभ बच्चन यांची जाहीर माफी!

स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार, दानवेंचा टोला

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.