AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरातील सरकारची कामगिरी शोभणारी नाही, जनता ठाकरे सरकारला नापास ठरवेल : रामदास आठवले

महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आज एक वर्ष पू्र्ण झालं आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी ठाकरे सरकारवर ट्विटरवर निशाणा साधला (Ramdas Athawale slams Thackeray Government).

वर्षभरातील सरकारची कामगिरी शोभणारी नाही, जनता ठाकरे सरकारला नापास ठरवेल : रामदास आठवले
ramdas athavle
| Updated on: Nov 28, 2020 | 4:57 PM
Share

मुंबई : “महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीला 100 पैकी किती गुण द्याल असा जनतेला प्रश्न विचारला तर जनता केवळ 30 गुण देऊन महाविकास आघाडी सरकारला नापास सरकार ठरवेल”, असा टोला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आज एक वर्ष पू्र्ण झालं आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी ठाकरे सरकारवर ट्विटरवर निशाणा साधला (Ramdas Athawale slams Thackeray Government).

“कोरोना संकटाचा मुकाबला करताना निर्णय घेण्यात केलेली दिरंगाई; वीजबिल माफीवरून जनतेच्या डोळ्यांत केलेली धूळफेक; अभिनेत्री कंगना रनौत आणि पत्रकार अर्णव गोस्वामी प्रकरणी दिसलेली सुडबुद्धि ही राज्य सरकार शोभणारी कामगिरी नाही”, अशी टीका आठवले यांनी केली (Ramdas Athawale slams Thackeray Government).

“लोकशाहीत विरोधकांचा सन्मान करायचा असतो; प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर द्यायचे असते, त्यांना उलटपक्षी प्रश्न का विचारतो म्हणून जाब विचारायचा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात धुवून पाठी लागणार, अशी विरोधकांना धमकीची भाषा वापरणे ही भूमिका समर्थनीय नसून लोकशाहीला मारक आहे”, असा घणाघात त्यांनी केला.

“महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावरच मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणी दिलेला निकाल राज्य सरकारला आत्मचिंतन करायला लावणारा आहे. मुंबई मनपाने केलेली कारवाई वैयक्तिक द्वेषातून झाल्याचा ठपका राज्य सरकारवर उच्च न्यायालयाने ठेवला आहे”, असं आठवले म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात धुवून विरोधकांच्या मागे लागणार, अशी धमकी देणे हे संविधानिक पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीला शोभणारे नाही. लोकशाहीत विरोधकांचा सन्मान करायचा असतो; प्रश्न विचारणाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे असते. हात धुवुन मागे लागायचे नसते. विरोधकांच्या मागे हात धुवून लागणार ही मुख्यमंत्र्यांनी दिलेली धमकी संविधानिक दृष्ट्या चूक; लोकशाहीला मारक भूमिका आहे”, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातमी :

‘कोरोना व्हायरस ठाकरे सरकारला म्हणाला, नागपूरला याल तर त्रास देईन, मुंबईत तुमच्या वाटेला येणार नाही’, मुनगंटीवारांचा उपरोधिक टोला

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.