‘कोरोना व्हायरस ठाकरे सरकारला म्हणाला, नागपूरला याल तर त्रास देईन, मुंबईत तुमच्या वाटेला येणार नाही’, मुनगंटीवारांचा उपरोधिक टोला

सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर सडकून टीका केली (Sudhir Mungantiwar slams Maharashtra Government).

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 16:18 PM, 28 Nov 2020

नागपूर : “अधिवेशन घेणं हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीवर असता कामा नये. संविधान सभेने या संदर्भात निर्णय घेतला आहे. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, यासाठी अधिवेशन घेतलं पाहिजे. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेणं 1953 च्या करारानुसार आवश्यक आहे. पण या सरकारची कोरोना व्हायरशी चर्चा झाली. बैठकीत कोरोना व्हायरसने नागपूरमध्ये याल तर त्रास देईन, पण मुंबईत अधिवेशन घ्याल तर मी तुमच्या वाटेत येणार नाही, असं सांगितलं”, असा उपरोधिक टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला (Sudhir Mungantiwar slams Maharashtra Government).

सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर सडकून टीका केली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभरामध्ये एकदाही विदर्भात पाय ठेवला नाही. विदर्भात उष्णता खूप असते. पण हिवाळ्यात विदर्भात उष्णता इतकी असते का पाय दिला तर पाय भाजेल?”, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला (Sudhir Mungantiwar slams Maharashtra Government).

“एक वर्षात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भात पाय ठेवला नाही. विदर्भाची फसवणूक केली. विदर्भात पाय दिला नाही समजू शकतो. पण विदर्भासाठी एखादी बैठकही घेतली नाही. विदर्भ वाऱ्यावर सोडला. आमच्या विदर्भाचे पुत्र नानासाहेब पाटोले विधानसभेचे अध्यक्ष आहेत. नावाप्रमाणे त्यांनी तरी सरकारला अधिवेशन नागपूरला होणार नाही या निर्णयावर नाना म्हटलं असतं. पण त्यांनी सुद्धा नकार दिला नाही हे आश्चर्य आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले.

‘मंत्रिमंडळाची बाराखडी उलटी’

महाविकास आघाडी सरकारकडून चांदा ते बांदाच्या लोकांना न्याय प्राप्त होईल, अशी अपेक्षा होती. सरकारने हा अपेक्षाभंग केला आहे, असं सांगतानाच मंत्रिमंडळाची यादी आपण वाचतो. तेव्हा पहिलं नाव U पासून सुरु होतं आणि शेवटचं नाव आदिती सुनील तटकरे म्हणजे A वर संपतं. जशी बाराखडी मंत्रिमंडळात उलटी झाली तसं यांचं कामंही उल्टं झालंय. उलट्या बाराखडी सारखं एक वर्ष उलटंसुलटं काम करणारं सरकार आपण अनुभवतोय, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

तुम्ही फक्त मंत्रिपदाच्या पाट्या लावायच्या का?

लोकमान्य टिळकांचं एक वाक्य प्रसिद्ध होतं, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आज सरकारचे निर्णय जेव्हा आपण बघतो, तेव्हा आज टिळक असते तर त्यांनीच सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारला असता, असं मुनगंटीवार म्हणाले. एक वर्षात त्यांची कोणतीही मुलाखत बघा, भाष्य ऐका, आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला. पण राज्य सरकारचं कार्य शून्य आहे. जे काही करायचं ते केंद्र सरकारनेचं हा शोध या सरकारने लावला, अशी खोचक टीकाही मुनगंटीवार यांनी केली.

संबंधित बातम्या:

केंद्राकडील GST ची थकबाकी न मिळाल्याने विकासाची गती मंदावली, धनंजय मुंडेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, देवेंद्र फडणवीसांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

मुख्यमंत्र्यांची मुलाखत एक दिवस आधी आली हे बरं झालं, नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरला असता : फडणवीस