यंदा शिवसेनेच्या मेळाव्यात ‘राम’दास कदम नाहीत, ऑडिओ क्लिपप्रकरण भोवलं?

कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या पक्षांतर्गत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदमांना एन्ट्री नसेल, अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची घोषणा करण्यात आली आहे.

यंदा शिवसेनेच्या मेळाव्यात 'राम'दास कदम नाहीत, ऑडिओ क्लिपप्रकरण भोवलं?
रामदास कदम, शिवसेना नेते


मुंबई : कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या पक्षांतर्गत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदमांना एन्ट्री नसेल, अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात 50 टक्के उपस्थितीत हा दसरा मेळावा पार पडणार आहे. मात्र, यावेळी रामदास कदम यांच्यासाठी नो एन्ट्री असेल, असं सांगितलं जात आहे. (No entry for former minister Ramdas Kadam in Shivsena’s Dussehra rally?)

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. मात्र, त्यासाठी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्याच एका नेत्यानं रसद पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तसा गंभीर आरोप केलाय. खेडेकर यांनी या प्रकरणात थेट रामदास कदम यांचं नाव घेतलं आहे. इतकंच नाही तर त्याबाबत एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. त्यात किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा संवाद असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

‘त्या’ ऑडिओ क्लिपची शहानिषा करुन कदमांवर कारवाई?

या कथित ऑडिओ क्लिपमुळेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं कळतंय. त्यामुळेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांना एन्ट्री नसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नाही तर रामदास कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. त्या कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा करुन रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं समजतं. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

कसा असेल यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा?

शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र कोरोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये त्याच जोरात हा मेळावा होईल. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील आणि देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील”.

यंदाचा दसरा मेळावा ऑनलाई नाही

“यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. नियम आणि संकेतांचं पालन करुन दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची देखील तीच इच्छा आहे” असं संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

इतर बातम्या :

अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याची तब्येत बिघडली! राज्य सरकारचं दुर्लक्ष, भाजपचा आरोप

पंकजा मुंडेंची तोफ भगवान गडावरून धडाडणार; पंकजा यांच्या निशाण्यावर कोण?; भागवत कराड मेळाव्याला उपस्थित राहणार?

No entry for former minister Ramdas Kadam in Shivsena’s Dussehra rally?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI