राणा जगजितसिंह पाटील मैदानात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सडेतोड पत्र

भाजप नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सडेतोड पत्र लिहिलं आहे. केंद्रानं आपले अडसर दूर केले आहेत तर आता चालढकल करणं बंद करा, असं राणा यांनी पत्रात म्हटलं आहे.

राणा जगजितसिंह पाटील मैदानात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सडेतोड पत्र
राणा जगजितसिंह पाटील
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 12:23 PM

मुंबई : भाजप नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील (JagjeetSinh Patil) यांनी मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सडेतोड पत्र लिहिलं आहे. केंद्रानं आपले अडसर दूर केले आहेत तर आता चालढकल करणं बंद करा. मराठा समाज भोळा आहे पण तुमच्या भुलथापांना तो बळी पडणार नाही हे तुम्ही ध्यानात घ्या, असं पत्रात राणा जगजितसिंह पाटील म्हणाले आहेत.

ओबीसींसंदर्भात मागासवर्ग आयोगाला सूचना मग मराठा आरक्षणावेळी काय झालं?

आरक्षणासाठी मराठा समाजाला प्रथम मागासलेपणा सिद्ध करावा लागेल पण दुर्दैवाने आणि विलंबाने मागासवर्गिय आयोगाची स्थापना केली तर खरी… पण अजून पर्यंत आवश्यकतेनुसार निधी व सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या नाही. इतकंच नाही तर राज्य सरकारने ज्याप्रमाणे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाला इंपेरिकल डेटा गोळा करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे मराठा समाजाला मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी कोणत्याही लेखी सूचना दिलेल्या नाहीत, अशी खंत राणा जगजिसतिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.

मराठ्यांना मागास सिद्ध करण्यासाठीच पाऊल नाही तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी परिस्थिती कशी सिध्द करणार?

ठाकरे सरकारने आत्तापर्यंत फक्त 102 वी घटना दुरूस्ती व 50 टक्यांची मर्यादा वाढवून देण्याबाबत केंद्र सरकार विरूद्ध ओरड केली… आता 50 टक्क्यांच्या मर्यादेसंदर्भात इंद्रा सहानी निकालानुसार हे अगदी स्पष्ट आहे की, जोपर्यंत एक्स्ट्रा ऑर्डिनरी परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत 50 टक्यांची मर्यादा ओलांडता येत नाही, पण मुळात आपल्या सरकारने मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी कुठलंही पाऊलं उचलले नाहीत तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी परिस्थिती कशी सिध्द करणार आहे, असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारला मराठा आरक्षण न्यायालयीन कचाट्यात अडकावायचे आहे का?, असा रोकडा प्रश्न राणा जगजितसिंह यांनी सरकारला विचारला आहे.

मराठा समाज भोळा आहे पण तुमच्या भुलथापांना बळी पडणार नाही

मराठा समाज भोळा आहे पण तुमच्या भुलथापांना तो बळी पडणार नाही हे ध्यानात ठेवावं, केंद्रानं आपले अडसर दूर केले आहेत तर आता चालढकल करणं बंद करा, असे ताशेरे पत्राच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर ओढले आहेत.

(Rana jagjit singh patil Wrote A letter to Cm Uddhav thackeray over Maratha Reservation)

हे ही वाचा :

सुप्रिया सुळे का म्हणाल्या देशात मोठा सोशल चेंज हवा?; वाचा सविस्तर

मुख्यमंत्री की राज्यपाल, कोण जिंकणार? 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत आज मोठा निर्णय

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.