खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण आता टोपी निघू देणार नाही : रावसाहेब दानवे

पुणे : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांना जोरदार टोले लगावले आहेत. दानवेंनी सत्तार यांच्या संकल्पाची आठवण करुन देत सातत्याने निवडून येऊन सत्तारांच्या डोक्यातील टोपी निघू देणार नाही, असं मत व्यक्त केलं. “सत्तार यांनी आधी मला पाडल्याशिवाय डोक्यावरील केसं वाढवू देणार नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे […]

खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण आता टोपी निघू देणार नाही : रावसाहेब दानवे
Abdul Sattar Raosaheb Danve
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 3:46 PM

पुणे : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांना जोरदार टोले लगावले आहेत. दानवेंनी सत्तार यांच्या संकल्पाची आठवण करुन देत सातत्याने निवडून येऊन सत्तारांच्या डोक्यातील टोपी निघू देणार नाही, असं मत व्यक्त केलं. “सत्तार यांनी आधी मला पाडल्याशिवाय डोक्यावरील केसं वाढवू देणार नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे मी त्यांचे खरं तर केसच उगवू देणार नव्हतो,” असा टोलाही दानवेंनी यावेळी लगावला (Raosaheb Danve criticize Abdul Sattar over his decision of wearing Topi).

रावसाहेब दानवे म्हणाले, “अब्दुल सत्तार यांचं पहिलं वक्तव्य रावसाहेब दानवेंना पाडल्याशिवाय डोक्यावर केस उगवू देणार नाही असं होतं. तरीही दानवे निवडून आले. त्यानंतर आता त्यांनी ‘पण’ केला की दानवेंना पाडल्याशिवाय टोपी घालणार नाही. अब्दुल सत्तार माझे चांगले मित्र आहेत. बिचारे ते इतकं बोलतात, पण निवडणूक आली की माझंच काम करतात. त्यांच्या तालुक्यात माझी आणि माझ्या तालुक्यात त्यांची सासुरवाडी आहे. पण मी त्यांची टोपी कधीच निघू देणार नाही. चिंता करू नका.”

“खरं तर केसच उगवू देणार नव्हतो. पण आता त्यांनी टोपी घातली,” असंही दानवे म्हणाले.

‘आमचं संरक्षण केवळ पोलीस करतो असं नाही’

रावसाहेब दानवे म्हणाले, “राज्य सरकार ज्या भावनेने काम करत आहे, ज्या भावनेने त्याकडे बघत आहे, यामागे त्यांचा उद्देश काय आहे मला माहित नाही. आमच्या सगळ्यांच्या सुरक्षा हटवल्या, तरी आम्ही त्याबद्दल सरकारकडे दाद मागणार नाही. आमचं संरक्षण केवळ पोलीस करतो असं नाही. आमचं संरक्षण या राज्यातली जनता करते. त्यामुळे सुरक्षा हटवली, तर आमच्या कामात कमीपणा येईल किंवा आम्ही हादरून जाऊ असं होणार नाही.”

“आमची सुरक्षा का हटवली हे त्यांनाच विचारलं पाहिजे. पोलीस संरक्षण देते तेव्हा ते सरकार देत नसते. यासाठी सरकारने नेमलेली एक समिती असते. ती समिती आढावा घेते. मग यांना काही धोका आहे का? याचा अहवाल पोलीस देते, मगच संरक्षण मिळतं. त्यानंतर ही सुरक्षेत कपात केली, पण आम्हाला काही चिंता नाही. आमचा काही आक्षेप नाही, कारण आमचं सरंक्षण जनता करते,” असंही रावसाहेब दानवे यांनी नमूद केलं.

‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेलं आरक्षण त्यांना टिकवता आलं नाही’

रावसाहेब दानवे म्हणाले, “मराठा आरक्षणाचा विषय हा सरकारने क्लिष्ट करून टाकला आहे. एक तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असलं तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करायला पाहिजे होते. नारायण राणे समिती नियुक्त केली. या समितीने आरक्षण दिलं होतं. यांना सगळ्यांना माहिती होतं की मागासवर्गीय आयोग नेमल्याशिवाय आरक्षण देता येत नाही आणि हे आरक्षण टिकत नाही. मात्र, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेले हे आरक्षण होते. त्यांना ते टिकवता आले नाही.”

“आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ते आरक्षण दिलं आणि ते टिकवले. हेच टिकवण्याची जबाबदारी या सरकारची होती. यासाठी ते वेगवेगळ्या गोष्टी करतात. मला असं वाटते ते समाजाला मान्य नाही. एकूणच आमचं स्पष्ट मत आहे की सुप्रीम कोर्टात तामिळनाडूतील आरक्षणाला स्टे नाही आणि महाराष्ट्रातील आरक्षणाला स्टे आहे. हे सरकार सार्थ वकिलांची फौज उभी करण्यास कमी ठरलं आहे. वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या मागण्या करतो, पण सगळ्यांचं मत एकच आहे. शेवटी मराठा समाजाला आरक्षण मिळावं,” असंही ते म्हणाले.

“बर्ड फ्लू हे चिंतेचे कारण आहे सरकारने वेळीच दखल घेतली पाहिजे. हा प्रसार जास्त झाला तर एका बाजूला मानव आणि दुसऱ्या बाजूला पक्षांची हानी होईल. हे परवडण्यासारखं नाहीये,” असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

दानवेंनी लोणावळ्यात भाजप महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकिला हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचेही संकेत दिले. ते म्हणाले, “भाजप पक्षाचा मूळ पिंड विरोधी पक्षाचा आहे. बहुमत युतीला मिळालं, पण आपल्या मित्राने धोका दिला. मोदींच्या नावाने मतं मागितली याचा त्यांना विसर पडला. आपण स्वबळावर लढलो असतो, तर विधानसभेला 175 जागा निवडून आल्या असत्या. त्यामुळे पुढच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढायची तयारी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी करावी.”

हेही वाचा :

रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही; सत्तार गरजले

सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, आम्ही त्यांना टोप्या पुरवू; महाजनांचा टोला

हर्षवर्धन जाधव ग्रामपंचायतीच्या राजकारणातून बाद? संजना जाधवांची एन्ट्री!

Raosaheb Danve criticize Abdul Sattar over his decision of wearing Topi

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.