Ratnagiri-Sindhudurg Lok sabha result 2019 : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निकाल

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विनायक राऊत विजयी झाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 61.69  टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 4 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून विनायक राऊत, काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर […]

Ratnagiri-Sindhudurg Lok sabha result 2019 : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निकाल
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : विनायक राऊत
सचिन पाटील

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 05, 2019 | 3:47 PM

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विनायक राऊत विजयी झाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 61.69  टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 4 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून विनायक राऊत, काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर आणि महाराष्ट्र स्वाभिमानकडून निलेश राणे यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघात तिहेरी लढत होती.

पक्ष उमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाविनायक राऊत (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीनवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)पराभूत
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षनिलेश राणेपराभूत

राज्यातील प्रमुख राजकीय लढतीपैकी एक

महाराष्ट्रातील राजकीय दृष्या रंगतदार लढत म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गची लढत पाहिली जाते. एनडीएतील दोन घटकपक्ष या निवडणुकीत आमने सामने होते. एकीकडे नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष तर दुसरीकडे कोकणातला बालेकिल्ला सांभाळत असलेले शिवसेनेचे विनायक राऊत. सलग दुसऱ्यांदा हे दोघे लोकसभा निवडणुकीत आमने सामने आलेत.

मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चार टक्यांनी मतदानाची आकडेवारी घटली.

 विधानसभानिहाय 2014 आणि 2019 ची मतदानाची आकडेवारी 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघ      2014 मतदान%        2019 मतदान %

चिपळूण                                    62.94                      56.77

रत्नागिरी                                    65.27                       62.96

राजापूर                                      64.35                       58.09

कणकवली                                 69.2                        63.59

कुडाळ                                      66.75                       64.17

सावंतवाडी                                67.43                         65.50

एकूण                                    65.89                      61.69

2014 च्या निवडणुकीत नारायण राणे यांच्याविरोधात बंड केलेल्या सावंतवाडीत सर्वात जास्त मतदान यंदा सुद्धा झालं. 2019 मधील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 14 लाख 54 हजार 525 मतदारांपैकी 8 लाख 97 हजार 246 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे 2014 च्या तुलनेत इथं मतदानात चार टक्यांनी घट झाली. चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं. तर आकडेवारीत सर्वात जास्त मतदान रत्नागिरी विधानसभा मतदार संघात झालंय. इथं तब्बल 1 लाख 76 हजार मतदान झालंय. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ वियजात की पाॅईंटची भूमिका बजावत आहे.

यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट्य, कोणाकोणाच्या सभा?

रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेना प्रक्षप्रमुखु उद्धव ठाकरे यांची केवळ एक सभा झाली. तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून प्रचाराची सर्व धुरा खासदार नारायण राणेंवर होती. एनडीएचे दोन घटक पक्ष आमने सामने असल्याने मुख्यमंत्र्यांची सभा आयत्यावेळी रद्द केली गेली. कोकणातील विकासाचा मुद्दा न पकडता या निवडणुकीत केवळ आरोप प्रत्यरोप यावर हि निवडणुक रंगली होती. खंबाटा एव्हिएशन कंपनीपासून ते उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपर्यतचे मुद्दे या प्रचाराच्या रणधुमाळीत पहायला मिळाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें