फॉर्म्युल्यानुसार सभापतीपद द्या, अन्यथा… रत्नागिरीत राष्ट्रवादीचा शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

रत्नागिरी जिल्हा परिषदेत सभापतीपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी शिवसेना नेत्यांना पत्र लिहिलं आहे (Ratnagiri ZP Election Shivsena Vs NCP)

फॉर्म्युल्यानुसार सभापतीपद द्या, अन्यथा... रत्नागिरीत राष्ट्रवादीचा शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी Vs शिवसेना
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 9:31 AM

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार एक सभापतीपद मिळावे, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. सभापतीपद न दिल्यास अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा करण्याचा इशारा दिला आहे. येत्या 22 मार्चला रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. (Ratnagiri ZP Election Shivsena Vs NCP)

रत्नागिरी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे 15 सदस्य आहेत. सभापतीपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी शिवसेना नेत्यांना पत्र लिहिलं आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांना पत्र लिहिलं.

भास्कर जाधवांच्या चिरंजीवाचे नाव चर्चेत

आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी चिरंजीव अजून राष्ट्रवादीत आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या भास्कर जाधव यांच्या चिरंजीवाचे नाव रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी चर्चेत आहे. भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीत असलेल्या आपल्या मुलासाठी फिल्डिंग सुरु केली आहे.

काका-पुतण्यामध्ये चुरस

दुसरीकडे, शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचे बंधू बाळ जाधव यांच्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे काका आणि पुतण्यामध्ये पदासाठी चुरस पहायला मिळणार आहे.  (Ratnagiri ZP Election Shivsena Vs NCP)

जि.प. अध्यक्षपद निवडणूक 22 मार्चला

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतींची निवड येत्या 22 मार्चला होणार आहे. सव्वा सव्वा वर्षांसाठी शिवसेनेने ही सर्व पदं वाटून दिली होती. कोरोना काळात काम करण्याची संधी मिळाली नाही म्हणून सव्वा वर्ष पूर्ण झालेल्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून चर्चा सुरु होती. मात्र शिवसेनेच्या आदेशानुसार या सर्वांनी राजीनामा दिला होता.

विक्रांत जाधवांना ZP अध्यक्षपद कसं द्यावं?

मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांचे नाव चर्चेत आहे. पण विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांना कशी संधी देता येईल, यावर सेनेत खलबतं सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी मुलाला ZP अध्यक्षपद कसं द्यावं? शिवसेनेला प्रश्न

काका पुतण्यामध्ये चढाओढ, कोण होणार रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष?

भास्कर जाधवांच्या नाराजीचे पडसाद रत्नागिरी झेडपी अध्यक्ष निवडणुकीत?

(Ratnagiri ZP Election Shivsena Vs NCP)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.