AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे पदवीधर निवडणुकीतून ‘रयत’ची माघार, तर खोतांचा सन्मान राखण्याची चंद्रकांत पाटलांची ग्वाही

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली होती. मात्र, रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपला उमेदवार मागे घेण्याची तयारी दाखवली आहे.

पुणे पदवीधर निवडणुकीतून 'रयत'ची माघार, तर खोतांचा सन्मान राखण्याची चंद्रकांत पाटलांची ग्वाही
| Updated on: Nov 17, 2020 | 2:05 AM
Share

सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली होती. मात्र, रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपला उमेदवार मागे घेण्याची तयारी दाखवल्यामुळे भाजप समोरील मतविभाजनाचा संभाव्य धोका टळलेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यात आज ( 16 नोव्हेंबर) बैठक झाली. या बैठकीत रयतने आपला उमेदवार मागे घ्यावा असा निर्णय झाला. रयत क्रांती संघटनेकडून कोल्हापूरचे प्राध्यापक एन. डी. चौगुले (N D Chaugule) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.  (Rayat kranti sanghatana agreed to withdraw application form pune graduate constituency election)

“चंद्रकांत पाटील यांची माझ्यासोबत बैठक झाली. महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारे फायदा होईल अशी कुठलीही भूमिका आम्ही घेणार नाही. आम्ही भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना निवडून आणण्यासाठी जोमाने काम करु,” असं सदाभाऊ खोत म्हणाले.

कोल्हापूरचे प्राध्यापक एन. डी. चौगुले (N D Chaugule) यांना रयत क्रांती संघटनेकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी स्वत: ही उमेदवारी जाहीर केली होती. एन. डी. चौगुले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी जोमाने सुरुवातदेखील केली होती. आधीच महाविकास आघाडीचं तगडं आव्हान असताना रयत क्रांतीच्या या निर्णयामुळे भाजपच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगितले जात होते.

त्यांनतर, मतांचे विभाजन टाळण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्यात आज बैठक झाली. या बैठकीत रयत क्रांती संघटनेच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाला. यावेळी महाविकास आघाडीला कुठल्याही प्रकारे फायदा होईल अशी भूमिका आम्ही घेणार नाही. भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटना आपला उमेदवार मागे घेणार आहे. आमच्यात जे काही मतभेद झाले, त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. आगामी काळात सत्तास्थानांचे वाटप करताना सदाभाऊ खोत यांचा नक्कीच विचार करणार, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचे समजते.

संबंधित बातमी :

शेतकऱ्यांना दिलेली मदत म्हणजे कोपराला गूळ लावायचा आणि हाताला चाटायचा; सदाभाऊ खोत यांचा घणाघात

पक्षातून हाकलून लावले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच नाही; राजू शेट्टींचा खोत यांच्याशी हातमिळवणीस नकार

राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, सदाभाऊ खोत यांची मागणी

(Rayat kranti sanghatana agreed to withdraw application form pune graduate constituency election)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.