“नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?” रोहिणी खडसेंच्या प्रश्नावर भाजप आमदार म्हणतो “बात दूर तक जायेगी”

एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवरुन रोहिणी खडसे आणि राम सातपुते यांच्यात ट्विटरवॉर रंगलं. (Rohini Khadse Khewalkar Ram Satpute )

"नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?" रोहिणी खडसेंच्या प्रश्नावर भाजप आमदार म्हणतो "बात दूर तक जायेगी"
रोहिणी खडसे खेवलकर आणि राम सातपुते

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी खडसेंवर हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर सातपुतेंना उत्तर देताना खडसेंच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर (Rohini Khadse Khewalkar) यांनी “तुम्ही नागपुरी बांगड्या भरला होत्या का?” असा सवाल विचारला. त्यानंतर रोहिणी खडसे आणि सातपुते यांच्यात ट्विटरवॉर रंगलं. (Rohini Khadse Khewalkar BJP MLA Ram Satpute Twitter War over Eknath Khadse Devendra Fadnavis)

‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत’ अशा शब्दात एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका केली होती. त्यावर बोलताना “नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊबद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या गोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल” असं ट्वीट राम सातपुतेंनी केलं होतं.

रोहिणी खडसे यांचं उत्तर

“अहो जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?” अशी घणाघाती टीका रोहिणी खडसेंनी केली.

राम सातपुतेंची पुन्हा टीका

यानंतरही सातपुते यांनी दुसर्‍यांदा ट्वीट करत “ताई भोसरी जमीन घोटाळ्यामुळे मंत्रीपद गेलं ना हो नाथाभाऊंचं. या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तीच कारवाई झाली ना तेव्हा. आणि यामुळेच आपला 2019 ला मुक्ताईनगरच्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई..? बात निकली ही है तो दूर तक जायेगी ..!” असा टोला लगावला. (Rohini Khadse Khewalkar Ram Satpute )

संबंंधित बातम्या :

PHOTO | कोण आहेत रोहिणी खडसे ज्यांना जयंत पाटलांनी व्याजासकट परतफेड करण्याचा शब्द दिला?

(Rohini Khadse Khewalkar BJP MLA Ram Satpute Twitter War over Eknath Khadse Devendra Fadnavis)

Published On - 10:40 am, Tue, 20 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI