मी राहुल गांधींच्या जागी असतो तर 'तो' निर्णय घेतला असता : रोहित पवार

कोल्हापूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा एक भाग आहेत. सध्या रोहित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुणांना अधिक संधी देण्यावर भर दिला जाणार असल्याची शक्यता आहे.  रोहित पवार यांनी …

मी राहुल गांधींच्या जागी असतो तर 'तो' निर्णय घेतला असता : रोहित पवार

कोल्हापूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा एक भाग आहेत. सध्या रोहित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुणांना अधिक संधी देण्यावर भर दिला जाणार असल्याची शक्यता आहे.  रोहित पवार यांनी तसे संकेत दिले आहेत.

यावेळी रोहित पवार यांनी चुलत भाऊ पार्थ पवार यांच्या पराभवावरही भाष्य केलं. पार्थ हा खूपच नवखा होता, खूप अनुभवी लोक पडले, त्यांचा पराभव झाला. पार्थच्या पराभवाचा अभ्यास केला जाईल, असं रोहित पवार म्हणाले.

त्याचबरोबर मी जर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जागी असतो तर राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली असती. त्यानंतर संपूर्ण देशभर पक्षाचं काय चुकलं आहे याचा अभ्यास केला असता. त्या पद्धतीनं काम केलं असतं, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीबाबत काय?

विधानसभा लढवणार आणि कोणत्या मतदार संघातून लढवणार हे अजून निश्चित झालं नाही. पण पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण क्षमतेनं पार पाडणार, असं रोहित पवार यांनी यावेळी नमूद केलं.

बारामतीत चंद्रकांत पाटलांनी आम्हाला कोणतीही हूरहूर लावली नाही. तसं असतं तर सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य वाढलं नसतं असंही रोहित पवार म्हणाले.

पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाबाबत निकालाच्या 5 दिवसांनी भाष्य केलं. “फक्त एका निवडणुकीसाठी नाही, तर सदैव मी लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन”, अशी प्रतिक्रिया पार्थ यांनी ट्विटरवर दिली आहे.

संबंधित बातम्या  

पराभवानंतर पाच दिवसांनी पहिली प्रतिक्रिया, पार्थ पवार म्हणतात…. 

राष्ट्रवादीला झटका बसण्याची चिन्हं, धनंजय महाडिक-मुख्यमंत्र्यांची भेट  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *