जनतेचं काही पडलेलं नाही, स्वत:ची पोळी भाजण्यासाठी फडणवीसांची 'ती' विधाने : रोहित पवार

फडणवीसांच्या दाव्यावर राष्ट्रवादीचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार यांनी टीव्ही 9 मराठीकडे प्रतिक्रिया दिली आहे. (Rohit Pawar on Devendra Fadnavis)

जनतेचं काही पडलेलं नाही, स्वत:ची पोळी भाजण्यासाठी फडणवीसांची 'ती' विधाने : रोहित पवार

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इनसायडरच्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सत्तास्थापनेबाबत चर्चा झाल्याचा दावा केला होता. त्यावरुन महाराष्ट्रात मोठ्या राजकीय चर्चा झडत असताना, राष्ट्रवादीचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार यांनी टीव्ही 9 मराठीकडे प्रतिक्रिया दिली आहे. (Rohit Pawar on Devendra Fadnavis)

रोहित पवार म्हणाले, “राजकीय पोळी भाजायची असेल तर आग लागते. धूर आहे तिथं आग आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस राजकीय स्टेटमेंट देऊन व्यक्तिगत पातळीवर अपेक्षा निर्माण करत आहे. आग पेटेल आणि त्यांची स्वतःची पोळी भाजता येईल असं त्यांना वाटतं. त्यांना जनतेचं काहीच वाटत नसून ते स्वतःचे हित पाहत आहेत”

VIDEO : आखाडा | देवेंद्र फडणवीस यांचे गौप्यस्फोट आताच का?

विरोधी पक्षांकडे काहीच राहिलेलं नाही. त्यामुळे अशी विधानं करायची, काही झालं तर पाहायचं असं सुरु आहे. मात्र अशा चर्चा करणारे फक्त दहा टक्के लोक आहेत. जनतेत अशी कोणतीच चर्चा नाही, असंही रोहित पवार म्हणाले.

फडणवीस यांचा राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेचा दावा हे राजकीय व्यक्तीचं राजकीय स्टेटमेंट होतं. यामध्ये मला काही तथ्य वाटत नाही. सारखंच विरोधकांकडून राजकीय स्टेटमेंट येत असतात. आम्हाला राजकारण करायचे नसून आमचं सर्वांचं लक्ष समस्यांवर आहे, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट 

“आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. थेट राष्ट्रवादी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही. थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. याबाबत योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातील एका चर्चेत मी होतो. एका चर्चेत मी नव्हतो,” असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीदरम्यान केला होता.

रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा

दरम्यान, रोहित पवार यांनी यावेळी गोपीचंद पडळकर यांच्यावरही निशाणा साधला. “गोपीचंद पडळकर यांचे राजकीय स्टेटमेंट होतं. त्यांचं विधान त्यांच्याच नेत्यांना चुकीचं वाटलं. पवारसाहेब जनतेच्या हृदयात बसले आहे. गेल्या 55 वर्षपासून ते सामाजिक काम करत आहेत. पडळकरांचं वय नाही तेवढे दिवस पवारसाहेब समाजहिताचं काम करत आहेत. त्यामुळं अशा मोठ्या लोकांच्या विरोधात बोलल्यावर आपली राजकीय पोळी भाजेल, टीव्हीवर आणि पेपरमध्ये येऊ असं काहींना वाटतं आहेत. त्यामुळं ते खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत” असं रोहित पवार म्हणाले.

(Rohit Pawar on Devendra Fadnavis)

वाचा : दु:ख आणि चीड, पडळकरांचं वय नाही तेवढं पवारसाहेबांचं काम : रोहित पवार 

संबंधित बातम्या  

आज गौप्यस्फोट करतोय, थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, चर्चाही झाल्या, पण पवारांनी भूमिका बदलली : फडणवीस 

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबाबतचा इंटरेस्ट वाढला, त्यांच्याशी दोन मुद्द्यावर पटू शकतं : देवेंद्र फडणवीस   

भाजपसोबत सत्तास्थापन करण्यात राष्ट्रवादीचा थेट सहभाग होता का? फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर जयंत पाटील म्हणतात… 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *