वडापाव आणि कटिंग चहावर दिवस काढले, हॉस्टेलमध्ये राहिले, दलित पँथर ते संसद… रामदास आठवलेंचा हा संघर्ष माहीत आहे का?

MP Ramdas Athawale | आज रामदास आठवले यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद आणि त्या अनुषंगाने आलेले राजकीय ग्लॅमर असले तरी त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. लहानपणापासून जगण्यासाठीचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीत झोकून देऊन केलेले काम, वाहत्या वाऱ्याची दिशा ओळखून दाखवलेले राजकीय चातुर्य किंवा सगळ्यांशी जुळवून घेण्याच्या वृत्तीमुळे रामदास आठवले आजही महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान टिकवून आहेत.

वडापाव आणि कटिंग चहावर दिवस काढले, हॉस्टेलमध्ये राहिले, दलित पँथर ते संसद... रामदास आठवलेंचा हा संघर्ष माहीत आहे का?
रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 6:59 AM

मुंबई: राजकारणात काही व्यक्ती अशा असतात की ते सत्तेत असोत किंवा नसोत, त्यांच्या राजकीय पक्षाची व्याप्ती लहान असो अथवा त्यांच्या राजकारणाला मर्यादा असोत पण या व्यक्तींच्या उल्लेखाशिवाय राजकारणाचे वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अशाच एका दुव्याची भूमिका पार पाडणारे नेते म्हणजे खासदार रामदास आठवले(Ramdas Athawale). भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (RPI) सर्वेसर्वा आणि एक खासदार या दोन्ही गोष्टी सोडल्या तरी रामदास आठवले यांच्याभोवती स्वत:चे असे एक वेगळे वलय आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ते कायमच चर्चेचा विषय ठरताना दिसतात. रामदास आठवले यांची राजकीय भूमिका, कविता आणि फॅशन स्टेटमेंट कायमच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय राहिली आहे.

आज रामदास आठवले यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद आणि त्या अनुषंगाने आलेले राजकीय ग्लॅमर असले तरी त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. लहानपणापासून जगण्यासाठीचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीत झोकून देऊन केलेले काम, वाहत्या वाऱ्याची दिशा ओळखून दाखवलेले राजकीय चातुर्य किंवा सगळ्यांशी जुळवून घेण्याच्या वृत्तीमुळे रामदास आठवले आजही महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान टिकवून आहेत.

कोण आहेत रामदास आठवले?

रामदास आठवले यांचा जन्म 25 डिसेंबर 1959 रोजी सांगली जिल्ह्यातील अगलगाव येथे झाला. रामदास आठवलेंच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर आई हौसाबाई यांनी काबाडकष्ट करुन त्यांना वाढवले. रामदास आठवले यांचे प्राथमिक शिक्षण तासगावच्या ढालेवाडी येथे पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी रामदास आठवले मुंबईत आपल्या काकांकडे राहायला आले. शालेय शिक्षण पूर्ण करुन महाविद्यालयात गेल्यानंतर रामदास आठवले वडाळ्याच्या सिद्धार्थ वसतीगृहात राहायला लागले. याठिकाणी त्यांची खऱ्या अर्थाने राजकीय आणि सामाजिक जडणघडण झाली.

त्या काळात मुंबईत हे वसतीगृहच गोरगरिबांचे आश्रयस्थान होते. येथे चळवळीविषयी खूप चर्चा होत असत. याठिकाणी आल्यानंतर रामदास आठवले पुरोगामी आणि दलित चळवळीतील अनेक मान्यवरांची भाषणे आणि व्याख्याने ऐकण्यासाठी जात असत. हळूहळू लोकांशी संपर्क वाढत होता. प्रा. अरुण कांबळे यांचे त्यांना वैचारिक पाठबळ मिळाले. 1972 मध्ये दलित पँथरची स्थापना झाल्यानंतर रामदास आठवले या संघटनेत सहभागी झाले. या चळवळीच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला.

जगण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष

रामदास आठवले महाविद्यालयीन जीवनात वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजच्या बाजुला असलेल्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये 50 क्रमांकाच्या खोलीत राहायचे. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांच्याकडे पैसे नसायचे. त्यातच त्यांनी दलित पँथरचं काम सुरू केलं. तेव्हा ते दलित पँथरची पत्रके, स्वत लिहिलेल्या बातम्या वर्तमानपत्राला द्यायचे. आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन संघटना बांधायचे. तेव्हा कार्यकर्ते त्यांना चहा आणि वडापाव द्यायचे. तो खाऊनच आठवले यांची गुजराण सुरु होती. वस्त्यातील बायका कधी जेवण द्यायच्या. तर कधी एखाद्या कार्यकर्त्याकडून वडापाव मिळायचा.

रामदास आठवले एक पत्र्याची पेटी घेऊन सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये आले होते. ती पेटी या 50 क्रमांकाच्या रुममध्ये कालपरवापर्यंत तशीच होती. मात्र, हे हॉस्टेल धोकादायक झाल्याने पाडण्यात आलं. त्यामुळे आठवले आणि पँथरच्या आठवणीही नाहीशा झाल्या होत्या.

नामांतराच्या लढ्यात भाग

महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीत महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या नामांतराच्या चळवळीत रामदास आठवले सहभागी होते. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी ही चळवळ सुरु झाली होती. हा नामांतराचा लढा पुढे बरीच वर्षे सुरु राहिला. या काळात रामदास आठवले यांनी शिवसेनेशी व सरकारशी त्यांनी संघर्ष केला. अनेक नेत्यांसह मोर्चे आणि आंदोलनात ते सहभागी झाले. शेवटी मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ’ असा नामविस्तार वा नामांतर झाले.

रामदास आठवले यांची राजकीय कारकीर्द

रिपब्लिकन पक्षात काम करताना रामदास आठवले यांचा कल सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडे होता. 1990 ते 1996 या काळात त्यांनी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम केले. या काळात रामदास आठवले यांच्याकडे समाजकल्याम, परिवहन, रोजगार हमी या खात्यांचे मंत्रिपद होते. नंतरच्या काळात रामदास आठवले मुंबई उत्तर मध्य आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.

1998 मध्ये रामदास आठवले पहिल्यांदा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले. त्यानंतर सलग दुसऱ्या टर्ममध्येही लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. खासदारकीच्या तिसऱ्या टर्ममध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी घरोबा केला. 2009 साली पंढरपूर लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर रामदास आठवले यांचे आघाडी सरकारशी बिनसले. त्यामुळे 2011 मध्ये रामदास आठवले आघाडी सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर रामदास आठवले 2014 साली राज्यसभेवर निवडून गेले. तर 2016 मध्ये रामदास आठवले यांची सामाजिक न्याय खात्यामधील राज्यमंत्रिपदावर नियुक्ती झाली.

कविता आणि अनोखा फॅशन सेन्स

रामदास आठवले यांच्या चारोळ्या आणि कविता हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. अगदी प्रतिस्पर्ध्यांवर टीका करण्यापासून संसदेतील भाषणांमध्ये रामदास आठवले आपल्या कवितांचा चपखलपणे वापर करतात. याशिवाय, रामदास आठवले यांची रंगीबेरंगी कपडे आणि शूज घालण्याची शैलीही अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरते. सूट परिधान केल्यानंतर त्यावर स्पोर्टस शूज घालणे असो किंवा लक्ष वेधून घेतील असे रंगीबेरंगी कपडे असोत, रामदास आठवले हे कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.