संघ प्रचारक, कार्यालय प्रमुख ते आमदार; अतुल भातखळकरांची उंच भरारी!

भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून प्रसिद्ध आहे. (rss pracharak to mla, read atul bhatkhalkar political journey)

संघ प्रचारक, कार्यालय प्रमुख ते आमदार; अतुल भातखळकरांची उंच भरारी!
अतुल भातखळकर, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 3:48 PM

मुंबई: भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून प्रसिद्ध आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो, पूजा चव्हाण प्रकरण असो, धनंजय मुंडे प्रकरण असो की सचिन वाझे प्रकरण… प्रत्येकवेळी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचं काम भातखळकर यांनी केलं आहे. ठाकरे सरकारचे विधान आणि निर्णयावर भातखळकरांची तात्काळ प्रतिक्रिया येत असते. अत्यंत अॅक्टिव्ह आमदार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. म्हणूनच भाजपने त्यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. संघ प्रचारक ते भाजपचा कार्यालय प्रमुख म्हणून काम सुरू केलेल्या भातखळकरांची राजकीय भरारी तितकीच उंच आहे. (rss pracharak to mla, read atul bhatkhalkar political journey)

राजीव गांधींचा प्रभाव

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अतुल भातखळकर यांच्यावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींचा प्रभाव पडला होता. राजीव गांधी देशाचं काही तरी भलं करतील असं त्यांना वाटायचं. त्याकाळात ते मित्रांसोबत तसा वाद घालून पटवूनही द्यायचे.

पत्रकार व्हायचं होतं

भातखळकर यांना पत्रकार व्हायचं होतं. 1987 ते 1991 शिक्षण घेत असतानाच त्यांनी जर्नालिझमचा कोर्स पूर्ण केला होता. त्यांना इंग्रजी पत्रकारिता करायची होती. त्यासाठी एका वर्तमानपत्रात प्रयत्नही सुरू केला होता.

योगायोगाने राजकारणात

इंग्रजी वर्तमानपत्रात नोकरीची शोधाशोध सुरू केलेली असतानाच एकेदिवशी चोरडिया आणि कुलकर्णी हे संघ स्वयंसेवक त्यांच्या घरी आणि त्यांच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला. या दोघांशीही त्यांचा संघात परिचय झाला होता. मात्र, या दोघांच्या आग्रहानंतर भातखळकर यांनी भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. अशा तऱ्हेने योगायोगानेच ते राजकारणात आले.

कार्यालय प्रमुख आणि महाजनांचा प्रभाव

1992मध्ये भाजपने त्यांच्यावर कार्यालय प्रमुखपदाची जबाबदारी दिली. त्यावेळी स्वर्गीय प्रमोद महाजन सातत्याने पक्ष कार्यालयात यायचे. कार्यालयीन कामातही भाग घ्यायचे. महाजनांच्या सातत्याने संपर्कात आल्याने त्यांच्यावर महाजनांचा प्रभाव पडला. 1995 मध्ये राज्यात युतीचं सरकार आलं. त्यानंतर त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. सोबतच त्यांच्यावर प्रसिद्धीप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. याचवेळी ते भाजपचे मुखपत्रं असलेल्या ‘मनोगत’चे संपादक म्हणूनही कार्यरत होते.

तिकीट मिळालं नाही, काम थांबलं नाही

विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर कांदिवली पूर्व हा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे भाजपच्या वाट्याला हा मतदारसंघ येईल, असा अंदाज बांधून त्यांनी तीन वर्षे आधीच काम सुरू केलं होतं. पण 2009च्या निवडणुकीत त्यांना तिकीट मिळालं नाही. या मतदारसंघातून काँग्रेसचे रमेशसिंह ठाकूर निवडून आले होते. तिकीट मिळालं नाही म्हणून भातखळकर निराश झाले नाहीत. त्यांनी काम सुरूच ठेवलं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळालं. आठ वर्ष या मतदारसंघात केलेलं काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट यामुळे भातखळकर भरघोस मतांनी विजयी झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी दणदणीत मतांनी विजय मिळवला.

बंगालमध्ये डाव्यांची सत्ता का टिकली?

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी तब्बल 25 वर्षे राज्य केलं. एखाद्या राज्यात एवढ्या दीर्घकाळ एखाद्या पक्षाचं सलग सरकार असणं हा खरंतर चमत्कारच होता. संघ, भाजपासह सर्वांनाच त्यांचं आश्चर्य वाटत होतं. पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांची राजवट का टिकली? याचा अभ्यास करण्यासाठी 1997मध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक पश्चिम बंगालला पाठवलं होतं. या अभ्यास दौऱ्यानंतर भातखळकर यांनी त्यावर एक पुस्तिकाही काढली होती.

भातखळकर आपल्या प्रवासाविषयी काय म्हणतात…

“ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी रा.स्व. संघाचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून दिलेल्या तीन वर्षांनी माझ्या जीवनाची दिशा निश्चित झाली आणि त्याची पायाभरणीही झाली. राजकीय कारकीर्द सुरू झाल्यावरही संघाचा प्रचारक म्हणून झालेले संस्कार मी कधीच विसरू शकलो नाही. ते संस्कार आजही माझ्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग बनले आहे. 1991पासून माझ्यावर भाजपाची जबाबदारी सोपवण्यात आली. कार्यालय सचिव म्हणून माझी नेमणूक झाली. पक्षाचा प्रवक्ता म्हणून पक्षाची भूमिका मांडण्याची संधी मला मिळाली. 1995मध्ये पक्षांतर्गतच वितरित होणाऱ्या ‘मनोगत’ या पक्षाच्या मासिक मुखपत्राच्या संपादनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. असा प्रवास करत एका टप्प्यावर 2014 मध्ये मला कांदिवली पूर्व विधानसभेतून आमदारकीचे तिकीट मिळाले. मी निवडून आलो. 5 वर्षात पूर्ण क्षमतेने मतदारांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. कामाची पावती म्हणून पक्षाने मला पुन्हा कांदिवली पूर्व मतदार संघातून तिकीट दिले. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यापुढेही माझ्या पाठीशी राहतील अशी आशा आहे.”

राजकीय प्रवास

1987: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक 1991: भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ता 1995: भाजपचे मुखपत्र असलेल्या ‘मनोगत’चे संपादक 1999: प्रवक्ता, भाजप महाराष्ट्र प्रदेश 2003: सरचिटणीस, भाजप मुंबई प्रदेश 2012: सरचिटणीस, भाजप महाराष्ट्र प्रदेश 2014 2019: कांदिवली पूर्वेतून आमदार म्हणून विजयी

पुस्तके

डंकेल आणि डब्ल्यूटीओवरील दोन पुस्तकांचे लिखाण. (rss pracharak to mla, read atul bhatkhalkar political journey)

संबंधित बातम्या:

आधी काँग्रेस, नंतर मोदी विरोधात बंड; अशी आहे नाना पटोलेंची राजकीय कारकिर्द!

सहकार ते राजकारण; जाणून घ्या कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील?

पँथर ते काँग्रेस… नितीन राऊतांचा सामाजिक, राजकीय संघर्ष माहीत आहे का?

(rss pracharak to mla, read atul bhatkhalkar political journey)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.