‘लखोबा लोखंडे’चं लिखाण हे फडणवीसांचं मत होतं का?, रुपाली चाकणकरांचा सवाल

अभिजित लिमये याला सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी कॉल केला. मग त्याने जे लिखाण केल तेच फडणवीसांचं मत होतं का? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी केलाय. तसंच आयटी सेलला हाताशी घेऊन अशी कामं केली जात आहेत. याला सर्वस्वी जबाबदार भाजप आणि भाजपचे आयटी सेल असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे.

'लखोबा लोखंडे'चं लिखाण हे फडणवीसांचं मत होतं का?, रुपाली चाकणकरांचा सवाल
रुपाली चाकणकर, देवेंद्र फडणवीस


पुणे : सोशल मीडियावर महाविकास आघाडी सरकार, ठाकरे परिवार, शिवसेना नेते आणि शरद पवार यांची बदनामीकारक पोस्ट फेसबुकवर अपलोड करण्यात आल्या होत्या. या पोस्ट करणारा तोतया ‘लखोबा लोखंडे’ उर्फ अभिजित लिमये याला पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि काळं फासलं आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या ‘लखोबा लोखंडे’वरुन भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केलीय. (Rupali Chakankar questions Leader of Fadnavis from Lakhoba Lokhande Facebook page)

अभिजित लिमये याला सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी कॉल केला. मग त्याने जे लिखाण केल तेच फडणवीसांचं मत होतं का? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी केलाय. तसंच आयटी सेलला हाताशी घेऊन अशी कामं केली जात आहेत. याला सर्वस्वी जबाबदार भाजप आणि भाजपचे आयटी सेल असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे.

‘लखोबा लोखंडे’ पोलिसांच्या ताब्यात

‘लखोबा लोखंडे’ या फेसबुक पेजवरून सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. तसंच ‘मला पकडून दाखवल्यास 100 कोटी रुपयांचे बक्षीस देणार’ असं चॅलेंज देणाऱ्या अभिजीत लिमये याच्या पुणे सायबर क्राईमने मुसक्या आवळल्या.

शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं

लिमये याला आज पुणे येथे न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी या अभिजित लिमयेच्या तोंडाला काळे फासत त्याच्याकडून पुन्हा असे करणार नाही, असं वदवून घेतले. सोशल मीडियावर व्यक्त होताना प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु मोठ्या कष्टाने ज्या नेत्यांनी आपली कारकीर्द घडवली त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अशाच प्रकारे समाचार घेणार, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं.

‘लखोबा लोखंडे’ कसा सापडला?

दरम्यान, लिमये याला त्याच्या मुंबईच्या माहिममधील त्याच्या सासरवाडीतून पोलिसांनी काल पुण्यात आणलं. पुणे शहर शिवसेनेची वॉर रूम सांभाळणारा आदित्य चव्हाण याने ‘लखोबा लोखंडे’ची सर्व खोटी 7 फेसबुक अकाउंट हॅक केली. ती सर्व माहिती पोलिसांना सादर केल्यामुळेच तो सापडला. आज त्याला कोर्टात हजर केलं असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

‘चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा’

रुपाली चाकणकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. चंद्रकांतदादांमुळे महाराष्ट्रात सध्या निखळ मनोरंजन होत आहे. त्यांच्यावर अजितदादांनी करमणूक कर लावावा, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केलं. त्यानंतर चाकणकरांनी चंद्रकातदादांची खिल्ली उडवली.

चंद्रकांतदादांची खिल्ली उडवणारं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. तसंच अजितदादांना विनंती करत चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावावा, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी केंद्राच्या जीएसटी परताव्यावरही बोट ठेवलं आहे.

इतर बातम्या :

राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटलांना संधी, प्रज्ञा सातव यांना विधानसभा की विधान परिषद?

माध्यमं, उद्योगपती, राजकीय नेत्यांवर बेछूट आरोप करत भाजपकडून ब्लॅकमेलिंगचं काम, पटोलेंचा गंभीर आरोप

Rupali Chakankar questions Devendra Fadnavis from Lakhoba Lokhande Facebook page

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI