महाराष्ट्रात भोंदू डॉक्टरांकडून सप्टेंबरमधील ऑपरेशनची नवी तारीख, 'सामना'तून निशाणा

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 'ऑपरेशन कमळ'चेच ऑपरेशन करुन भाजपला धडा दिला, असा टोला अग्रलेखातून लगावला आहे.

महाराष्ट्रात भोंदू डॉक्टरांकडून सप्टेंबरमधील ऑपरेशनची नवी तारीख, 'सामना'तून निशाणा

मुंबई : ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपच्या ‘ऑपरेशन कमळ’चा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र सरकार सप्टेंबरपर्यंत पडण्याचे भाकित वर्तवल्यानंतर ‘सामना’तून राणेंना भोंदू डॉक्टरांची उपमा देण्यात आली आहे. (Saamana on BJP Operation Lotus and Narayan Rane)

“काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे” अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती. “सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा” या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करण्यात आले होते. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करुन भाजपला धडा दिला, असा टोला अग्रलेखातून लगावला आहे.

“राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच” असा सल्ला शिवसेनेने भाजपला दिला आहे.

हेही वाचा : फडणवीसांना महाराष्ट्रात खूप कामे, मी मोकळाच; संजय राऊत, कधी येता कर्नाटकला? : नारायण राणे

“बंडखोर नेते सचिन पायलट यांनी दिल्लीत येऊन प्रियंका-राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पायलट यांनी माघार घेतली. या महिनाभराच्या घोडेबाजारात हसे झाले आहे ते भारतीय जनता पक्षाचे. आपल्या विचारांची नसलेली राज्या-राज्यांतील सरकारे आम्ही चालू देणार नाही किंवा सरळ पाडू हे त्यांचे धोरण आहे, पण राजकीय घमेंडीत त्यांचा सौदा चुकतो व शेअर बाजार गडगडतो. सचिन पायलट यांचे बंड यशस्वी झाले नाही. कारण पहिल्या झटक्यात ते आमदारांचा मोठा आकडा जमवू शकले नाहीत व अशोक गेहलोत यांची खिंड भाजप भेदू शकला नाही.” असेही यात लिहिले आहे. (Saamana on BJP Operation Lotus and Narayan Rane)

“पैसा व तपास यंत्रणा हाती असल्यावर प्रत्येक वेळी सरकारे पाडता येतातच असे नाही. मुळात विरोधी पक्षांची सरकारे चालूच द्यायची नाहीत हा अट्टाहास लोकशाहीत का बाळगावा? महाराष्ट्रातले सरकार सप्टेंबरपर्यंत पाडूच पाडू असे आता भाजपातील उपऱ्या नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. राजस्थानात काम फसले तेव्हा आता महाराष्ट्रात पाडापाडीचे काम सुरु करायचे हे कसले धोरण?” असा सवालही ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

(Saamana on BJP Operation Lotus and Narayan Rane)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *