सत्तेनंतर खुर्चीसाठी वाद, राजस्थानात काँग्रेसमधले दोन गट भिडले

जयपूर : काँग्रेसचं राजस्थानमध्ये सत्तास्थापन करण्याचं स्वप्न पूर्ण होतंय. सरकार स्थापन करण्यासाठी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आमदारांची बैठक सुरु आहे. काँग्रेस कार्यकर्ते यासाठी मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. पण राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे दोन चेहरे सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. हा वादा हाणामारीपर्यंत गेला […]

सत्तेनंतर खुर्चीसाठी वाद, राजस्थानात काँग्रेसमधले दोन गट भिडले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

जयपूर : काँग्रेसचं राजस्थानमध्ये सत्तास्थापन करण्याचं स्वप्न पूर्ण होतंय. सरकार स्थापन करण्यासाठी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आमदारांची बैठक सुरु आहे. काँग्रेस कार्यकर्ते यासाठी मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. पण राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे दोन चेहरे सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. हा वादा हाणामारीपर्यंत गेला होता.

राजस्थानचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच घेणार आहेत. त्याआधी आमदारांचं मत जाणून घेतलं जात आहे. अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय हायकमांड घेईल असं दोन्ही नेत्यांनी सांगितलंय.

कोण आहेत सचिन पायलट?

सचिन पायलट हे राजस्थानमधील काँग्रेसचे युवा नेते आहेत. खासदार असलेल्या सचिन पायलट यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकली. त्यांच्याकडे गेल्या साडे चार वर्षांपासून काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद आहे. दोन लोकसभा आणि विधानसभेच्या चार पोटनिवडणुका जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

राजस्थान काँग्रेसमध्ये सचिन पायलट यांच्याकडे नव्या ऊर्जेचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना गेल्या पाच वर्षात त्यांनी काँग्रेसची संख्या 21 वरुन 100 वर नेली आहे. असं असलं तरी सचिन पायलट हे उद्धट असल्याचा आरोपही केला जातो. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं पाठबळ आणि जनतेच्या पाठिंब्याची उणीव आहे.

कोण आहेत अशोक गहलोत?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी आतापर्यंत दोन वेळा राजस्थानचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. काँग्रेसच्या केंद्रीय संघटनेत अत्यंत महत्त्वाचं पद त्यांच्याकडे आहे. शिवाय कार्यकर्ते आणि जनतेमध्ये गहलोत यांची छाप आहे. अत्यंत कमी वयात प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या गहलोत यांच्याकडे कुशल संघटक म्हणून पाहिलं जातं.

अशोक गहलोत यांची दुसरी बाजूही आहे. कारण, राजस्थानच्या जनतेने नवा बदल म्हणून काँग्रेसला निवडून दिलंय. पण अशोक गहलोत हे नव्या बदलाचं प्रतिक ठरु शकत नाहीत असं बोललं जातं. कारण ते कित्येक दशकांपासून राजस्थानच्या राजकारणात सक्रिय आहेत. गटबाजीचा आरोपही गहलोत यांच्यावर होत असतो. शिवाय सचिन पायलट यांना काम करताना रोखल्याचा आरोपही काँग्रेसच्याच एका गटाकडून केला जातो.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.