AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Vaze Case : पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक

सचिन वाझे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डिफेन्ड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांचा आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून डॅमेज कंट्रोल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं बैठकांचं सत्र सुरु आहे. 

Sachin Vaze Case : पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक
| Updated on: Mar 15, 2021 | 3:58 PM
Share

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यानंतर आता राज्यातील राजकारणात जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. सचिन वाझे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डिफेन्ड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांचा आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून डॅमेज कंट्रोल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं बैठकांचं सत्र सुरु आहे. (NCP will hold an important meeting to control the damage in the Sachin Waze case)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पवार भेट

सचिन वाझे प्रकरण स्थानिक असल्याचं सांगत पवारांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. पण आता मात्र या प्रकरणात पवारांनी लक्ष घातल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी सचिन वाझे प्रकरणावर चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना हटवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये महत्वाची चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक

राज्याचं गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पूजा चव्हाण ते सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांना अपयश आल्यानं देशमुख यांना पदावरुन हटवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशमुख यांच्याकडी गृहमंत्रीपद काढून ते उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री बदलण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात येईल, असंही सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाची बैठक होणार आहे.

राजकीय नेत्याचा बळी की अधिकाऱ्याचा?

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या काही तास बैठक चालली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मुख्यमंत्र्यांच्या भेट घेत आहेत. वाझे प्रकरणी ठाकरे सरकारची चांगलीच अडचण झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री बदललं जाण्याची जोरदार चर्चा आहे. अनिल देशमुख यांच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे हे खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पण देशमुखांना बदललं जाणार की मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग हे मात्र निश्चित होऊ शकलं नाही. एनआयएचा तपास हा सरकारच्या गळ्याचा फास बनत चालला आहे. त्यामुळेच वाझे प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांवरही गाज पडू शकते अशीही चर्चा आहे. शेवटी सरकार राजकीय राजकीय नेत्याचा बळी देणार की अधिकाऱ्याचा हे महत्वाचं आहे. पण जोरदार चर्चा आहे हे निश्चित.

संबंधित बातम्या :

नितेश राणेंनी खंडणीचा आरोप केलेले वरुण सरदेसाई कोण आहेत?

मोठी बातमी: सचिन वाझेंची प्रकृती पुन्हा खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवले

वाझेप्रकरणी ठाकरे सरकारवर आणखी एक मोठं संकट; गृहमंत्री बदलणार की मुंबई पोलीस आयुक्त?

NCP will hold an important meeting to control the damage in the Sachin Waze case

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.