AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सुनिल शेट्टी चिंताग्रस्त, सदाभाऊ खोत म्हणाले, ‘कटोरा घेऊन दारी आला तर…’

Sadabhu Khot controversial statement on tomato prices : मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोची चर्चा चांगलीचं रंगली आहे. विशेष म्हणजे टोमॅटो महाग झाल्यामुळे अभिनेता सुनिल शेट्टी याने एक वक्तव्य केलं होतं. त्याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार नेते सदाभाऊ खोत यांनी घेतला आहे.

टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सुनिल शेट्टी चिंताग्रस्त, सदाभाऊ खोत म्हणाले, 'कटोरा घेऊन दारी आला तर...'
Sadabhu Khot controversial statement on tomato pricesImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 14, 2023 | 9:58 AM
Share

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून पालेभाज्या महाग झाल्यामुळे सामान्य नागरिक परेशान झाले आहेत. टोमॅटोचा दर (tomato prices) दीडशे ते दोनशे रुपये झाल्यामुळे अनेकांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर टोमॅटोची अधिक चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर काही मीस्म सुध्दा व्हायरल झाले आहेत. काल सुनिल शेट्टी (Suniel Shetty) यांनी केलेल्या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी मराठी अभिनेत्याने देखील टोमॅटोच्या बाबत एक वादग्रस्त फोटो शेअर केला होता. त्याचा सुध्दा खोत यांनी चांगलाचं समाचार घेतला. त्यानंतर त्या अभिनेत्याने आपलं पोस्टर त्यांच्या सोशल मीडियावरुन हटवलं होतं.

अवकाळी पाऊस, मान्सूनचं उशिरा आगमन यामुळे पालेभाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. सामान्य नागरिक वाढलेल्या दरांमुळे अधिक परेशान झाला आहे. टोमॅटो दर इतके वाढले आहेत की, केंद्र सरकार आता महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यातून टोमॅटो खरेदी करणार आहे.

काल बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याने एक वक्तव्य केलं होतं. “सध्या टोमॅटोचे दर वाढत असल्यामुळे मी टोमॅटो खाणं कमी केलं आहे. लोकांना वाटतं आम्ही सुपरस्टार आहोत, त्यामुळे महागाईचा काही परिणाम होत नाही पण तसं नाही असं वक्तव्य सुनिल शेट्टी याने केलं होतं.” या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. “जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढग माई ..’ असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

काल ज्यावेळी सुनिल शेट्टी यांनी वक्तव्य केलं, त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरती अधिक लोकांनी टीका केली. देशातील इतर महागाई दिसत नाही का ? त्यावर सुध्दा बोलत जा असा नाराजीचा सूर पाहायला मिळाला.

एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की, जेवणात टोमॅटो खाल्ला नाही म्हणून कोणाचा मृत्यू झाला आहे का ? इतर पालेभाज्या आहेत त्या खा ? काही दिवसात सगळ्या पालेभाज्यांचे दर उतरतील असंही खोत म्हणाले.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...