AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का? निवडणुकीआधीच मशाल चिन्हही जाणार; कुणी केला सर्वात मोठा दावा?

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह 'मशाल' अडचणीत आले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले असून त्यावर आता एका राजकीय पक्षाने दावा केला आहे. आपले मशाल चिन्ह परत मिळावे अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला केली असून त्यासाठी सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का? निवडणुकीआधीच मशाल चिन्हही जाणार; कुणी केला सर्वात मोठा दावा?
mashal
| Updated on: Jan 18, 2024 | 3:11 PM
Share

कल्याण | 18 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नुकताच विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटालाच खरी शिवसेना अशी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे गटाने घेतला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने याचिका दाखल आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या मशाल निवडणूक चिन्हावर एका पक्षाने दावा केला आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी उभी फूट पाडून पक्ष बळकवल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाने एकनाथ शिंदे यांचा गट हाच खरी शिवसेना हे स्पष्ट झाल्याने ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे. निवडणूक आयोगाने आधीच शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याने शिवसेनेवर मोठे संकट असतानाच आता उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल या निवडणूक चिन्हावर समता पार्टीने दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकात मशाल चिन्हावर निवडणूक लढविण्यात अडचणी येणार असल्याचे म्हटले जात आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर ठाकरे गटाकडे आता मशाल चिन्हावरच निवडणूक लढविण्याचे लक्ष्य होते. मात्र समता पार्टीने ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह आमच्या पक्षांचे असून आमची एक राष्ट्रीय पार्टी आहे. बिहार मणिपूर आणि इतर ठिकाणी निवडणुकीत आम्ही मशाल चिन्हावरच निवडणूक लढलो आहोत. आता लोकसभा निवडणुकांआधी निवडणूक आयोगाने सर्वच राष्ट्रीय पक्षांना चिन्हासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे. आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे आम्ही निवडणूक आयोगाकडे जमा केली असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही आमच्या ‘मशाल’ चिन्हाचा दावा करणार असल्याचे समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे.

अन्यथा सुप्रीम कोर्टात जाऊ…

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणाची ? हा वाद सुरू झाला. त्या वेळेस ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने तात्पुरते ‘मशाल’ चिन्ह दिले होते. आमच्या दाव्यानंतर सुप्रीम कोर्टाने ते चिन्ह ठाकरेंकडे ठेवण्यात यावे असे आदेश दिले. मात्र आता खरी शिवसेना शिंदे गटाची असल्याचा निर्णय झाला आहे. यामुळे आमचे चिन्ह निवडणूक आयोगाने का ? अडकून ठेवले आहे. अंधेरी निवडणुकीसाठी आमचे चिन्ह भाडेतत्त्वावर ठाकरेंना देण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पार्टीला निवडणूक आयोग चिन्ह देतात आणि त्यासाठी लागणारे सर्व दस्तावेज आम्ही निवडणूक आयोगाकडे जमा केलेला आहे आणि समता पार्टी या चिन्हासाठी सक्षम आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही आमचे उमेदवार प्रत्येक राज्यात देणार असून यासाठी ‘मशाल’ चिन्हाचा दावा निवडणूक आयोगाकडे करणार आहे. आमचे दस्ताऐवज पूर्ण आहेत. त्यामुळे मशाल चिन्ह आम्हालाच त्यांना द्यावे लागेल आणि नाही दिले तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असे समता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी म्हटले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.