सांगलीत शिवसेनेचा धक्का, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भाजप नेत्यांना शिवबंधन

भाजपच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला

सांगलीत शिवसेनेचा धक्का, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भाजप नेत्यांना शिवबंधन
उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून भाजप नेत्यांचा सेनाप्रवेश
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:07 PM

मुंबई/सांगली : आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेने (Shivsena) कंबर कसल्याचं दिसत आहे. सांगलीत शिवसेनेने भाजपला (BJP) सुरुंग लावला आहे. भाजपच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. (Sangli BJP Leaders joins Shivsena in presence of Uddhav Thackeray)

कोणाकोणाचे पक्षप्रवेश?

भाजपचे माजी सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे, सावर्डे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप माने पाटील, तासगावचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती कवठे एकंद गावचे जयवंत माळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

मुख्यमंत्र्यांचा एल्गार

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे – पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते, आनंद पवार यावेळी उपस्थित होते. “यापुढे होणाऱ्या ग्राम पंचायत, पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना मोठ्या ताकदीने उतरणार आहे” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजप नेत्यांना शिवबंधन बांधताना म्हणाले.

भाजपने शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांची बोळवण केल्यानेच नानासाहेब शिंदे, प्रदीप माने, अविनाश पाटील जयवंत माळी यांच्यासारखे कार्यकर्ते भाजपला रामराम ठोकत असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवा”

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे, त्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना त्यांनी पूर्ण ताकद लावण्यास सांगितले. (Sangli BJP Leaders joins Shivsena in presence of Uddhav Thackeray)

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काही दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक झाली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना मार्गगर्शन केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोमाने काम करा, लोकोपयोगी कामं करुन जनतेचा विश्वास संपादन करा, संपर्कमंत्री आणि पालकमंत्र्यांशी समन्वय राखा आणि एकजुटीने निवडणुकांना तोंड द्या, असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

महाविकास आघाडीची एकी

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला ‘एकीचे बळ’ लक्षात आलेले दिसत आहे. भाजपला रोखण्यासाठी राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढण्याची तयारी महाविकास आघाडीकडून सुरु करण्यात आली आहे. गावागावात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीचंच चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या :

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला एक नंबरचा पक्ष करा, उद्धव ठाकरेंचे आदेश

विकास आघाडीचं ठरलं ! भाजपला रोखण्यासाठी ग्रामपंचायतही एकत्र लढणार !

ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश

(Sangli BJP Leaders joins Shivsena in presence of Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.