डिपॉझिटसाठी दोन पिशव्या भरुन चिल्लर, सांगलीच्या उमेदवाराचा पराक्रम

सांगली : निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना अमानत रक्कम भरली जाते. त्यासाठी साताऱ्याचे अपक्ष उमेदवार अभिजित बिचकुले यांनी अनामत रक्कम म्हणून चक्क चिल्लर स्वरुपात साडेबारा हजार रुपये भरलेत. अभिजीत बिचुकले हे असे पराक्रमी उमेदवार आहेत, ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना डिपॉझिटची रक्कम चिल्लर स्वरुपात दिली आहे. दोन पिशव्या भरुन 25 हजार रुपयांची चिल्लर बिचुकलेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात …

डिपॉझिटसाठी दोन पिशव्या भरुन चिल्लर, सांगलीच्या उमेदवाराचा पराक्रम

सांगली : निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना अमानत रक्कम भरली जाते. त्यासाठी साताऱ्याचे अपक्ष उमेदवार अभिजित बिचकुले यांनी अनामत रक्कम म्हणून चक्क चिल्लर स्वरुपात साडेबारा हजार रुपये भरलेत.

अभिजीत बिचुकले हे असे पराक्रमी उमेदवार आहेत, ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना डिपॉझिटची रक्कम चिल्लर स्वरुपात दिली आहे. दोन पिशव्या भरुन 25 हजार रुपयांची चिल्लर बिचुकलेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली. सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

एक, पाच आणि दहा रुपयांची नाणी या डिपॉझिटच्या रकमेत बिचुकलेंनी दिली आहेत. एकूण 25 हजार रुपये डिपॉझिटसाठी चिल्लर बिचुकलेंनी आणली होती. मात्र, त्यांनी जातीचा दाखला दिल्यामुळे त्यांना अमानत रकमेत सूट मिळाली आणि त्यांना केवळ 12 हजार 500 रुपये जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात भरावे लागले.

गेल्या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदार संघात अभिजित बिचकुले यांच्या पत्नीने राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र सांगलीचे जावई असलेल्या अभिजित बिचकुले यांनी यंदा सांगलीतून लढण्याचे ठरवले आहे. सांगलीला चांगली करण्यासाठी मी निवडणुकीत उभा आहे अशी प्रतिक्रीया बिचुकलेंनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *