परमबीर सिंह कुठे गायब झाले? पोलिस आणि सरकारला पडलेल्या प्रश्नांचं संजय निरुपमांनी दिलं उत्तर!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Oct 31, 2021 | 2:09 PM

वारंवार समन्स बजावूनही परमबीर सिंह चौकशीला हजर राहत नाहीत. त्यामुळे हे वॉरंट बजावण्यात आलं आहे. अशावेळी परमबीर सिंह हे बेल्जियममध्ये असल्याचं ट्विट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलंय. निरुपम यांच्या या ट्विटने आता मोठी खळबळ उडवून दिली आहे.

परमबीर सिंह कुठे गायब झाले? पोलिस आणि सरकारला पडलेल्या प्रश्नांचं संजय निरुपमांनी दिलं उत्तर!
परमबीर सिंग

Follow us on

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग कुठे गायब झाले? हा प्रश्न पोलिसांसह राज्य सरकारला पडला आहे. ठाणे न्यायालय आणि मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनीही अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे. वारंवार समन्स बजावूनही परमबीर सिंह चौकशीला हजर राहत नाहीत. त्यामुळे हे वॉरंट बजावण्यात आलं आहे. अशावेळी परमबीर सिंह हे बेल्जियममध्ये असल्याचं ट्विट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलंय. निरुपम यांच्या या ट्विटने आता मोठी खळबळ उडवून दिली आहे. (Sanjay Nirupam claims that former Mumbai Police Commissioner Parambir Singh is in Belgium)

हे मुंबई पोलिसांचे माजी पोलिस आयुक्त. मंत्र्यावर खंडणी वसुलीचा आरोप लावला होता. स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की हे फरार आहेत. माहिती मिळाली आहे की ते बेल्जियमला आहेत. ते बेल्जियमला कसे गेले? यांना कुणी रस्ता मोकळा करुन दिला? आपण अंडरकव्हर अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाहीत का? असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.

ठाणे आणि मुंबईतील न्यायालयाकडून अटक वॉरंट

परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ठाणे कोर्टानंतर आता मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.

परमबीर सिंहांना संरक्षण नाहीच

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर अॅट्ऱॉसिटी आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात तपासादरम्यान त्यांना वारंवार समन्स बजावूनही ते कुठे आहेत? याचा पत्ता राज्य सरकारला लागू शकलेला नाही. त्यामुळे आता परमबीर सिंह यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार नाही असा शब्द आम्ही देणार नाही, असं राज्य सरकारनं 20 ऑक्टोबर रोजी हायकोर्टात म्हटलं होतं. अॅट्रॉसिटी प्रकरणात दोन वेळा समन्स बजावण्यात आलं होतं त्याला सिंह यांनी उत्तर दिलं होतं, अशी माहिती सिंह यांचे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात दिली आहे. मात्र, यापूर्वी परमवीर सिंह यांच्यावर कठोर कारवाई किंवा त्यांना अटक करणार नाही असं राज्य सराकरनं कोर्टात म्हटलं होतं. पण आजच्या सुनावणीवेळी हा शब्द आम्ही पुढे नेऊ शकणार नाही, कारण ते कुठे आहेत याचा पत्ता आम्हाला लागलेला नाही. ते कुठल्याही समन्सला उत्तर देत नाहीत, असं राज्य सरकारनं म्हटलं आहे.

इतर बातम्या :

‘कोणत्या दूध संघानं किती पैसे लाटले याचा हिवाळी अधिवेशनात भांडाफोड करणार’, विखे-पाटलांचा थोरातांना इशारा

जावयावर कारवाई केल्यानंच मलिकांनी वानखेडेंविरोधात मोर्चा वळवल्याचा आरोप, रामदास आठवलेंचा गंभीर आरोप

Sanjay Nirupam claims that former Mumbai Police Commissioner Parambir Singh is in Belgium

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI