‘कोणत्या दूध संघानं किती पैसे लाटले याचा हिवाळी अधिवेशनात भांडाफोड करणार’, विखे-पाटलांचा थोरातांना इशारा

मागच्या सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिलं. मात्र, शेतकऱ्यांना अनुदान न देता दूध संघाने ते पैसे हडप केले. कोणत्या दूध संधानं किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचा इशारा विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना दिलाय.

'कोणत्या दूध संघानं किती पैसे लाटले याचा हिवाळी अधिवेशनात भांडाफोड करणार', विखे-पाटलांचा थोरातांना इशारा
बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 1:14 PM

अहमदनगर : भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. यापूर्वी थोरातांचं थेटपणे नाव न घेता नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय, असं विखे पाटील म्हणाले होते. त्यानंतर आता कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचा इशाराच विखे-पाटील यांनी दिलाय. (Radhakrishna Vikhe Patil’s warning to Balasaheb Thorat over the misconduct in the Cooperative Milk Union)

मागच्या सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिलं. मात्र, शेतकऱ्यांना अनुदान न देता दूध संघाने ते पैसे हडप केले. कोणत्या दूध संधानं किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचा इशारा विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना दिलाय. विखे-पाटील म्हणाले की, संगरनेरमधील एका सहकारी दूध संघाने वर्षभर दुधाचे पैसे कापले. अन तेच पैसे रिबीट म्हणून देण्यात आले. शेतकऱ्यांचेच पैसे शेतकऱ्यांना दिले. तेश शेतकरी आता आंदोलन करणार आहेत.

नवाब मलिकांवरही विखे-पाटलांची टीका

विखे-पाटील यांनी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावरही हल्ला चढवला. शाहरुख खानचा मुलगा गांचा पितो की काय करतो? समीर वानखेडे बिचारा काय करत होता. गेले 25 दिवस हे सुरु आहे. जसं की देशात आता दुसरे प्रश्नच शिल्लक नाहीत. नवाब मलिकांनी शोधलेली वनस्पती शेतकऱ्यांना पुरवा असं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. कृषी खात्याला आदेश द्या, या वर्षी वनस्पतीचं बी मिळाले पाहिजे. त्यातून लाखो रुपयांचे उप्तादन मिळेल, असा खोचक टोला विखे-पाटील यांनी लगावलाय.

नगर जिल्ह्यातील मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय

नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल,’ असं सूचक वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे. विखे पाटील यांनी कोणाचंही नाव घेतले नाही. मात्र, त्यांचा रोख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याचं दिसून येतं.

पत्रकार म्हणाले, तो मंत्री कोण, विखे म्हणाले, ‘रुको जरा सबर करो!’

श्रीरामपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी हा आरोप केला. हा मंत्री कोण, असं पत्रकारांनी विचारलं असता ‘जरा सबुरीने घ्या, लवकरच नाव उघड होईल,’ असंही विखे पाटील म्हणाले. त्यांनी थोरातांचं थेट नाव घेणं जरी टाळलेलं असलं तरी त्यांचा रोख थोरातांकडेच होता, हे उघड आहे.

इतर बातम्या :

जावयावर कारवाई केल्यानंच मलिकांनी वानखेडेंविरोधात मोर्चा वळवल्याचा आरोप, रामदास आठवलेंचा गंभीर आरोप

नवाब मलिकांचे सर्व आरोप खोटे, क्रांती रेडकर यांचा पुन्हा एकदा दावा

Radhakrishna Vikhe Patil’s warning to Balasaheb Thorat over the misconduct in the Cooperative Milk Union

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.