Sanjay Raut ED Inquiry : ‘ईडी’चा पेपर राऊतांसाठी किती अवघड गेला? 10 तासांच्या चौकशीनंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

दुपारी 12 वाजता ईडी कार्यालयात संजय राऊत हजर झाले. त्यानंतर तब्बल 10 तासांनी ते ईडी कार्यालयातून बाहेर आहे. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ईडी ही एक जबाबदार केंद्रीय तपास यंत्रणा आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आपण दिली. पुढेही त्यांनी बोलावलं तर तपासात सहकार्य करेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

Sanjay Raut ED Inquiry : 'ईडी'चा पेपर राऊतांसाठी किती अवघड गेला? 10 तासांच्या चौकशीनंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया
सागर जोशी

|

Jul 01, 2022 | 10:24 PM

मुंबई : पत्राचाळ प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाकडून (Enforcement Directorate) आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली. दुपारी 12 वाजता ईडी कार्यालयात संजय राऊत (Sanjay Raut) हजर झाले. त्यानंतर तब्बल 10 तासांनी ते ईडी कार्यालयातून बाहेर आहे. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ईडी ही एक जबाबदार केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आपण दिली. पुढेही त्यांनी बोलावलं तर तपासात सहकार्य करेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं. ‘मी चौकशीला सहकार्य केलं, केंद्राची तपास यंत्रणा आहे. तर त्यांचे गैरसमज माझ्यासारख्याने दूर केले पाहिजेत, त्या शंका मी दूर केल्या आहेत. जी त्यांना माहिती हवी होती ती दिली आहे. गरज पडल्यास मला परत बोलवा, असंही सांगितल्याचं राऊत म्हणाले.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. पत्राचाळ विकसित करण्याचं काम प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या चाळीचा काही भाग खासगी विकासकाला विकला असल्याचा ईडीचा आरोप आहे. पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण राऊत यांच्यावर करण्यात आलाय. प्रवीण राऊत यांच्या गुरु कन्स्ट्रक्शन कंपनीला पत्रा चाळीतील 3 हजार फ्लॅटचं काम देण्यात आलं होतं. त्यापैकी 672 फ्लॅट भाडेकरारासाठी राखीव ठेवण्यात आले होते. बाकी म्हाडा आणि बिल्डर यांच्यात वाटून देण्यात येणार होते. मात्र, 2011 ते 2013 दरम्यान प्रवीण राऊत यांनी चाळीचे अनेक भाग खासगी बिल्डर्सना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

सुडाचं राजकारण, राऊतांचा आरोप

ईडीच्या चौकशीला जाण्याआधी संजय राऊत यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. मी ईडीला पूर्ण सहकार्य करणार आहे. सुडाच्या भावनेनं हे सगळं होत आहे. मात्र मी समर्थ आहे, मी एकटा जाईन, एकटा येईन, असं राऊत म्हणाले होते.

संजय राऊतांवर कारवाई होणार-सोमय्या

संजय राऊतांना हे पाचवं समन्स आहे. पहिल्यांदा 72 लाख रुपये परत केले त्यात काय गडबड केली? याची तपासणी होऊन कारवाई होईल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या हे संजय राऊत यांच्यावर आरोप करत आहेत. तर संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचं शाब्दिक युद्धही महाराष्ट्राने पाहिलं आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें