मोदीजी, आपण शूर आणि योद्धे, देश तुमच्या पाठीशी, पण सत्य काय ते बोला : संजय राऊत

"पंतप्रधानजी, आपण शूर आणि योद्धे आहात. आपल्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईल." असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. (Sanjay Raut insists PM Narendra Modi to speak up on India China Face off)

मोदीजी, आपण शूर आणि योद्धे, देश तुमच्या पाठीशी, पण सत्य काय ते बोला : संजय राऊत

मुंबई : “पंतप्रधानजी, आपण शूर आणि योद्धे आहात. आपल्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईल. संघर्षाच्या काळात देश तुमच्या पाठीशी आहे, मात्र सत्य काय आहे? काहीतरी बोला” अशी विनवणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. चीनी सैन्यासोबत झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (Sanjay Raut insists PM Narendra Modi to speak up on India China Face off)

“चीनच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर कधी मिळेल? गोळीही न झाडता आपले 20 जवान शहीद होतात, आपण काय केले? चीनचे किती जवान मारले गेले? चीनने आपल्या भूमीत घुसखोरी केली आहे का? पंतप्रधानजी, या संघर्षाच्या काळात देश तुमच्या पाठीशी आहे, मात्र सत्य काय आहे? बोला, काहीतरी बोला. देशाला सत्य जाणून घ्यायचं आहे. जय हिंद!” अशा आशयाचे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. “पंतप्रधानजी, आपण शूर आणि योद्धे आहात. आपल्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईल.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

(Sanjay Raut insists PM Narendra Modi to speak up on India China Face off)

याआधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारले आहेत. पंतप्रधान गप्प का आहेत? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित केले आहेत.

हेही वाचा :  एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा अभिमान, धीरोदात्त वीरमातेची प्रतिक्रिया

पंतप्रधान मौन बाळगून का आहेत? ते लपून का बसत आहेत? झाले तेवढे बस्स झाले! काय झाले ते आम्हाला समजलेच पाहिजे. आपल्या जवानांना मारण्याची चीनची हिंमतच कशी झाली? आपली जमीन बळकावण्याची चीनचे धारिष्ट्य कसे झाले, अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधी यांनी मोदींना उद्देशून केली आहे.

चीनी सैन्यासोबत गलवानच्या खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्याचे दु:खद वृत्त आहे. शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे. संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

भारत-चीन संघर्ष वाढला, भारतापुढे आता कोणते मार्ग?

Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?

India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?

(Sanjay Raut insists PM Narendra Modi to speak up on India China Face off)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *