संजय राऊत म्हणाले, विरोधक हे ब्लॅक फंगस, भाजप म्हणतं, तो तर दीड वर्षापूर्वीच महाराष्ट्राला लागलाय!

संजय राऊत यांनी विरोधक हे ब्लॅक फंसग असल्याची जहरी टीका केलीय. त्याला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय.

संजय राऊत म्हणाले, विरोधक हे ब्लॅक फंगस, भाजप म्हणतं, तो तर दीड वर्षापूर्वीच महाराष्ट्राला लागलाय!
शिवसेना खासदार संजय राऊत
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 8:16 PM

मुंबई : कोरोना संकट काळात आता देशात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने डोकं वर काढलंय. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 1 हजाराच्या आसपास सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. एकीकडे या आजाराने रुग्णांचा मृत्यू होत असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिसवरुन जोरदार राजकारणही पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विरोधक हे ब्लॅक फंसग असल्याची जहरी टीका केलीय. त्याला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. (Sanjay Raut mentions BJP as black fungus, BJP Leaders Prasad Lad and Atul Bhatkhalkar reply)

पुण्यात एका कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्धाटनावरेळी संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. कोरोना महामारीत मुंबईत चतांगल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेसह पंतप्रधान मोदींनीही कौतुक केलंय. मात्र, विरोधक त्यावर टीका करत आहेत. शिवसैनिकांनी विरोधकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करुन कामाकडे लक्ष द्यावं. कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केलीय.

प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर

संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेते प्रसाद लाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासूनच ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. महाविकास आघाडीच्या नावाने राज्याला ब्लॅक फंगस मिळाला असल्याचा पलटवार लाड यांनी केलाय. तसंच बोलताना जरा भान ठेवून बोला, असा सल्लाही लाड यांनी राऊतांना दिलाय. मुंबई महापालिकेत 2 हजार 200 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतानाच मेलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम शिवसेना करत असल्याची टीकाही राऊत यांनी केलीय. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोना काळात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही लाड यांनी केलाय.

अतुल भातखळकरांचाही निशाणा

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही राऊतांवर जोरदार टीका केलीय. ‘बोरु बहाद्दर म्हणतात विरोधक ब्लॅक फंगस आहेत. अच्छा, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायम कडी लावून आणि दडी मारुन घरी बसलेले असतात काय? लोक लाजेपायी दौऱ्यावर गेले तरी धावतपळत जेवायला घरीच येतात का? काय निधड्या छातीचे सत्ताधारी मिळालेत महाराष्ट्राला’, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

संबंधित बातम्या :

अजितदादांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यावा, नाहीतर 7 दिवस कोकणात राहून आपल्या स्टाईलने पंचनामे करावे, पाटलांची सूचना

देशात फक्त पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचेच राज्यपाल खूप काम करतायत; राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut mentions BJP as black fungus, BJP Leaders Prasad Lad and Atul Bhatkhalkar reply

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.