AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात फक्त पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचेच राज्यपाल खूप काम करतायत; राऊतांचा खोचक टोला

राज्यपाल त्या फाईलवर बसले आहेत. हा सरकारचा अपमान आहे. | Sanjay Raut Governor Bhagat koshyari

देशात फक्त पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचेच राज्यपाल खूप काम करतायत; राऊतांचा खोचक टोला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि संजय राऊत
| Updated on: May 22, 2021 | 11:07 AM
Share

मुंबई: सध्या देशात फक्त पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचेच राज्यपाल खूप काम करत आहेत, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. विधानपरिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांना फक्त दोन मिनिटं लागतील. मात्र, सध्या भगतसिंह कोश्यारी आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर हे खूपच काम करत आहेत, अशी टिप्पणी राऊत यांनी केली. (Shivsena MP Sanjay Raut takes a dig at Governor Bhagat koshyari)

ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उच्च न्यायालयाने राज्यपालांना विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीविषयी विचारणा केली होती. याविषयी राऊत यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हायकोर्टाने जे राज्यपालांना विचारले ते आम्ही सरकार म्हणून कितीतरी दिवसांपासून विचारतोय. मात्र, राज्यपाल त्या फाईलवर बसले आहेत. हा सरकारचा अपमान आहे. विधानपरिषदेवर राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती न करणं हे घटनाविरोधी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

तसेच तौक्ते चक्रीवादळामुळे हानी झालेल्या कोकणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत जास्तीत जास्त मदत जाहीर करतील, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

’12 आमदारांच्या नियुक्त्यांवर कधी निर्णय घेणार?’

विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांवर अजूनपर्यंत निर्णय का घेतला नाही ते स्पष्ट करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलेयत. 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडं शिफारसीद्वारे 12 नावे पाठवलीयत. यावर राज्यपालांनी हो किंवा नाही असा निर्णय घ्यायला हवा, शिफारसपत्र ड्रॉवरमध्ये ठेवून ते बसू शकत नाही, असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवले.

न्या. काठावाला आणि न्या. तावडे यांच्या खंडपीठापुढं यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी झाली. सामाजिक कार्यकर्ते रतनसोली लुथ यांनी ही याचिका दाखल केलीय. वकील गौरव श्रीवास्तव त्यांची बाजू मांडतायत. राज्य सरकारबरोबरच्या संघर्षामुळंच राज्यपालांनी 12 आमदारांच्या शिफारशीवर निर्णय घेतला नाही, असा युक्तिवाद श्रीवास्तव यांनी केला. इतर राज्यांमध्ये एका दिवसात निर्णय झाल्याची उदाहरणं त्यांनी कोर्टाला दाखवून दिली. घटनादत्त अधिकारांचं वहन करण्यात राज्यपाल अपयशी ठरल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. संबंधित बातम्या:

विधान परिषदेच्या 12 जागांबाबत निर्णय कधी? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्यपालांच्या सचिवांना सवाल

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग चक्रीवादळाला लाजवणारा, उद्धव ठाकरे खरंच बेस्ट सीएम : मनसे

महाराष्ट्रच काय कोणत्याही राज्यासोबत पंतप्रधानांचा भेदभाव नाही; चंद्रकांतदादांनी आरोप फेटाळले

(Shivsena MP Sanjay Raut takes a dig at Governor Bhagat koshyari)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.