AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत हसले, नंतर म्हणाले त्यासाठी रंजन गोगोईंना खासदार केलं, फडणवीसांचा राम मंदिराचा दावा राऊतांनी फोडून दाखवला

राम मंदिराबाबत (Ram mandir) बोलताना पत्रकारांच्या प्रश्नावर संजय राऊत आधी हसले आणि म्हणाले, मोदींनी करून नाही दाखवलं ते सर्वोच्च न्यायालयाने करून दाखवलं. त्या बदल्यात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना खासदार केलं.

पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत हसले, नंतर म्हणाले त्यासाठी रंजन गोगोईंना खासदार केलं, फडणवीसांचा राम मंदिराचा दावा राऊतांनी फोडून दाखवला
sanjay raut
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 3:57 PM
Share

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टिकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राम मंदिराबाबत (Ram mandir) बोलताना पत्रकारांच्या प्रश्नावर संजय राऊत आधी हसले आणि म्हणाले, मोदींनी करून नाही दाखवलं ते सर्वोच्च न्यायालयाने करून दाखवलं. त्या बदल्यात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना खासदार केलं. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. कोणी काही म्हटलं तरी इतिहास, दस्ताऐवज रेकॉर्ड्स आहेत. सीबीआय स्पेशल कोर्ट निर्माण झालं त्यासमोरचे साक्षीपुरावे आहेत, बाळासाहेब ठाकरेंची साक्ष आहे. शिवसेना नेत्यांना आरोपी केलं होतं. आडवाणींबरोबर ठाकरे त्यातील एक आरोपी आहेत. मग कोर्ट मूर्ख होते का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. शेकडो कारसेवक मुंबईतून गेले तेव्हा त्यांना कोणताही राजकीय पक्ष नव्हता. अगदी विद्याधर गोखल्यांपासून मोरेश्वर सावे, चंद्रकांत खैरे, सतीश प्रधान अनेक लोक आमचे इथून गेले होते. त्या काळातील सामना पाहिला तर कोण कोण कुठून निघाले? त्याची मॉनिंटरींग मुंबईतून होत होती. सेना भवनात त्या काळात वॉर रूम झाली होती तयार. तेव्हा आता कुणाला आता वेगळी माहिती द्यायची असेल. कितीही माहिती प्रसवली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही. शिवसेनेचं योगदान ऐतिहासिक आहे. हा लढा थंड पडला तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येला गेलो आणि वातावरण तापवलं. सरकारला जाग आली. अयोध्येशी आमचा संबंध काय हे रामाला माहीत आहे. असेही राऊत म्हणाले आहेत.

भाजपच्या आधी सेनेचा जन्म

भाजपच्या आधी शिवसेनेचा जन्म झाला आहे, जनता पक्षाचे पतन झाल्यावर भाजप जन्माला आले आहे असे म्हणत शिवसेनेच्या पहिल्या नगरसेवकापासून ते पहिल्या आमदारापर्यंत पाढा राऊतांनी वाचून दाखवला आहे. भाजपच्या जन्मतारखेचा दाखला जर त्यांनी आणला तर उत्तर देणं सोपं होईल लोकांना कळेल भाजप कधी जन्माला आला आणि शिवसेनेचा जन्म कधी झाला. भाजपचा जन्म 1980 च्या दशकात झाला. जनता पक्षाचं पतन झाल्यावर. शिवसेनेचा जन्म1969 सालाचा. शिवसेनेचा पहिला महापौर हेमचंद गुप्ते कधी झाले, त्यावेळी आमच्याकडे किती नगरसेवक होते ,या संदर्भातील एखादं अभ्यास शिबीर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये ठेवू आणि जर कोणाला त्याचा अस्वाद घ्यायचा असेल तर त्यांना येऊ द्या. असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक हे त्याच काळात निवडून आले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर गिरगावात प्रमोद नवलकर आमचे आमदार म्हणून निवडून आले होते. माझगावातून आमचे छगन भुजबळ निवडून आले होते. आमचे वाघ मुंबईतून निवडून आलेले आहेत अनेकदा भाजपच्या जन्मा आधी असेही राऊत म्हणाले आहेत.

पाच वर्षे औरंगजेबाला कवटाळून बसला का?

औरंगाबादचे नाव बदलण्यावरूनही संजय राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल चढवलाय. आपणही पाच वर्ष मुख्यमंत्री होता. त्यावेळी औरंगजेबाला कवटाळून बसला होता का ? असा सवाल फडणवीसांना राऊतांनी केला आहे. एखाद्या शहराचं नाव बदलायचं असेल तर केंद्राची परवानगी लागते. गेल्या काही वर्षापासून सरकार केंद्राकडे पाठपुरावा करत आहे. केंद्राने का परवानगी दिली नाही? हे विचारावे लागेल. तुम्हीही पाच वर्ष मुख्यमंत्री होता, तुम्हाला असं का वाटलं नाही? योगींनी प्रयागराज करून घेतलं तसंच फडणवीसांनी औरंगाबादचं संभाजीनगर का केलं नाही? हा सुद्धा प्रश्न आहे. आम्हला बाळासाहेबांनी तेव्हाच सांगितलं संभाजीनगर तेव्हाच ते आमच्यासाठी झालं आहे, असेही राऊत म्हणालेत.

तुम्ही साधं औरंगाबादचं संभाजीनगर केलं नाही, शिवसेनेच्या मर्मावर फडणवीसांचं बोट! पुन्हा उठणार नामांतराचा मुद्दा?

शिवसेनेचा पंतप्रधान! उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी ऐतिहासिक पुराव्यासह आरसा दाखवला?; काय म्हणाले?

बाळासाहेबांना अभिवादन करायला लाज वाटते त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसता? एवढी लाचारी? फडणवीसांचा हल्लाबोल!

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.